Dharmendra Health Update : 'धरमजींना घरी आणलंय, आता सगळं देवाच्या हातात', हेल्थ अपडेट देत हेमा मालिनी भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची हेल्थ अपडेट देताना अभिनेत्री हेमा मालिनी भावुक झाल्या.
advertisement
1/7

अभिनेते धर्मेंद्र नुकतेच रुग्णालयातून घरी परतले आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
2/7
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 11 दिवसांच्या उपचारानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर आता त्यांच्या जुहू येथील घरी उपचार सुरू आहेत.
advertisement
3/7
दरम्यान हा काळ संपूर्ण देओल कुटुंबासाठी खूप कठीण होता. सनी देओल, बॉबी देओल, हेमा मालिनी, ईशा देओल असे अनेक जण धर्मेंद्र यांच्याबरोबर रुग्णालयात होते.
advertisement
4/7
[caption id="attachment_1518395" align="aligncenter" width="1200"] हेमा मालिनी आणि देओल कुटुंबाकडून वेळोवेळी धर्मेंद्र यांची हेल्थ अपडेट देण्यात येत आहे. दरम्यान धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना अभिनेत्री हेमा मालिनी भावुक झाल्यात.</dd> <dd>[/caption]
advertisement
5/7
सुभाष के झा यांच्याशी बोलताना हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांची हेल्थ अपडेट दिली. त्यांनी सांगितलं. "माझ्यासाठी हा काळ सोपा नाहीये. धरमजींची हेल्थ आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची मुलं झोपली नाहीत, मी कमजोर पडू शकत नाही. खूप जबाबदाऱ्या आहेत पण मी खूश आहे की ते आता घरी परतले आहेत."
advertisement
6/7
"ते हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर आमची चिंता संपली आहे. त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या आजूबाजूला राहणं महत्त्वाचं आहे. बाकी सगळं वरच्याच्या ( देवाच्या ) हातात आहे."
advertisement
7/7
दरम्यान अभिनेते धर्मेंद्र यांनी डिस्चार्ज देण्याच्या आदल्या दिवशी त्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. पण काही वेळातच देओल कुटुंबाकडून ही माहिती खोटी असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Health Update : 'धरमजींना घरी आणलंय, आता सगळं देवाच्या हातात', हेल्थ अपडेट देत हेमा मालिनी भावुक