TRENDING:

It's Getting Hotter, 'अप्सरा' पाण्यात उतरली! सोनाली कुलकर्णीच्या बिकिनीतील फोटोंनी उडवला धुरळा!

Last Updated:
Sonalee Kulkarni Bikini Photos : सोनाली कुलकर्णीने ३७व्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
advertisement
1/6
'अप्सरा' पाण्यात उतरली! सोनाली कुलकर्णीच्या बिकिनीतील फोटोंनी उडवला धुरळा!
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अलीकडेच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केलेले बोल्ड फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. १८ मे रोजी आपला ३७ वा वाढदिवस साजरा करताना सोनालीने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिले, ते म्हणजे तिचा बिकिनी लूकमधला ग्लॅमरस अंदाज!
advertisement
2/6
सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी एकटीच निवांत वेळ घालवत असल्याचे दिसतेय. निळ्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर तिचा आत्मविश्वास आणि तिचे सौंदर्य दोन्हीही खुलून आले आहे.
advertisement
3/6
या फोटोंसह सोनालीने लिहिलेले कॅप्शनदेखील लक्ष वेधून घेणारे होते. तिने लिहिलेय ‘Coz “it” is getting hotter and younger?’ या मजेशीर पण आत्मविश्वासपूर्ण वाक्याने तिने स्वतःच्या वाढत्या वयातल्या आत्मस्वीकृतीचा आणि आत्मप्रेमाचा सुंदर दाखला दिला.
advertisement
4/6
या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबतच मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीचा हा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज तिच्या चाहत्यांना फारच भावला असून, सोशल मीडियावर तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
advertisement
5/6
सोनाली गेल्या काही काळात मोठ्या पडद्यावर फारशी दिसली नसली तरी, सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच सक्रिय असते. ती आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील विविध क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
6/6
सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी कोणतीही अधिकृत घोषणा नसली, तरी तिच्या सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटीमुळे ती नेहमीच चर्चेत राहते. वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केलेला तिचा हा हॉट अँड हॅपी मोमेंट चाहत्यांच्या आठवणीत नक्कीच राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
It's Getting Hotter, 'अप्सरा' पाण्यात उतरली! सोनाली कुलकर्णीच्या बिकिनीतील फोटोंनी उडवला धुरळा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल