TRENDING:

जया बच्चनला ऐश्वर्याच्या हाती द्यायच्या होत्या घराच्या जबाबदाऱ्या, पण लेकीने अडवलं, म्हणाली, 'असं केलंस तर...'

Last Updated:
जया बच्चन यांना त्यांची सून ऐश्वर्याकडे सर्व जबाबदाऱ्या सोपवायच्या होत्या, पण त्यांच्या मुलीने त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण केले.
advertisement
1/8
जया बच्चनला ऐश्वर्याच्या हाती द्यायच्या होत्या घराच्या जबाबदाऱ्या, पण...
बच्चन कुटुंब हे फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. स्टारडमपासून खाली पडून आणि स्वतःला पुन्हा सिद्ध करून अमिताभ यांनी त्यांना मेगास्टार का म्हणतात, हे दाखवून दिले. एक काळ असा होता की अमिताभ आर्थिक समस्येने ग्रासले होते. पण परिस्थिती पुढे त्यांनी हार मानली नाही आणि प्रबळ इच्छाशक्तीने आज १६०० कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली.
advertisement
2/8
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचे २००७ मध्ये लग्न झाले होते. अलीकडेच दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.
advertisement
3/8
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबात काही ठीक चालत नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण अलीकडेच, अभिषेकसोबतच्या ऐश्वर्याच्या फोटोंमुळे त्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. जया आणि ऐश यांच्या नात्याबाबत तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. पण तुम्हाला माहिती आहे का की, जया बच्चन यांना त्यांची सून ऐशकडे सर्व जबाबदाऱ्या सोपवायच्या होत्या, पण त्यांच्या मुलीने त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण केले.
advertisement
4/8
केवळ सामान्य लोकांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही सासू, सून, वहिनी यांच्या नात्यातील कडवटपणा पाहायला मिळतो. अलीकडे बच्चन कुटुंबातही असेच काहीसे पाहायला मिळाले. या भांडणाचे कारण मुलगी श्वेता बच्चन असल्याचीही चर्चा होती. मात्र, बच्चन कुटुंबीयांनी या कथित वृत्तांवर मौन बाळगले.
advertisement
5/8
बच्चन कुटुंबात सध्या सर्व काही ठीक आहे. मग मुलगी श्वेता बच्चनमुळे कुटुंबात तेढ निर्माण झाला होता का? सुनेकडे जबाबदाऱ्या सोपवण्यावरून श्वेताने जयाला 'असे करू नकोस' असे का सांगितले?
advertisement
6/8
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत लग्न करणार होता. त्यानंतर जयाने सून ऐश्वर्यासोबत घराच्या जबाबदाऱ्या शेअर करण्याबाबत बोलले होते, मात्र श्वेताने तिला तसे न करण्याचा इशारा दिला होता.
advertisement
7/8
जया बच्चन श्वेतासोबत 'कॉफी विथ करण'ला गेली होती, तेव्हा ही गोष्ट घडली. करण जोहरने जयाला सासू बनण्याच्या तिच्या भावनांबद्दल विचारले होते. त्याने विचारले 'आता ऐश्वर्या येईल आणि ती काही जबाबदाऱ्यांचा भार तुमच्या खांद्यावरून तिच्या खांद्यावर घेईल'. जया यांनी यावर होकार दिला आणि अशी आशा असल्याचे व्यक्त केले. त्या म्हणाल्या तिने केवळ काही जबाबदारी नाही तर सर्व जबाबदारी घ्यावी असे मला वाटते.
advertisement
8/8
जया बच्चनची ही गोष्ट श्वेताला कदाचित आवडली नाही. आईच्या निर्णयावर ती खूश नसल्याचे तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरून दिसून येत होते. जयाचे म्हणणे ऐकून ती आईला म्हणाली - 'आई, असे अजिबात करू नकोस. हे खूप भीतीदायक आहे. तिला हळूहळू जबाबदारी दे. ते तसे अवघड नाही'.<span style="background-color: var(--global--color-background); color: var(--global--color-primary); font-family: var(--global--font-secondary); font-size: var(--global--font-size-base);"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जया बच्चनला ऐश्वर्याच्या हाती द्यायच्या होत्या घराच्या जबाबदाऱ्या, पण लेकीने अडवलं, म्हणाली, 'असं केलंस तर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल