फक्त हार्ट अटॅक नाही तर करिष्माच्या एक्स नवऱ्याच्या मृत्यूमागे शॉकिंग कारण, मैदानाबाहेर संजीव कपूरसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Karishma Kapoor EX Husband Sunjay Kapur Death : अभिनेत्री करिष्मा कपूरचा एक्स नवरा संजीव कपूरचा हार्ट अटॅकने झाल्याची माहिती समोर आली. पण फक्त हार्ट अटॅक नाही तर आणि एक धक्कादायक कारण आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स नवरा प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. यूकेमधील एका पोलो मॅचदरम्यान त्याला हार्ट अटॅक आळा. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कपूर कुटुंब आणि त्यांचे जवळचे मित्रमंडळी धक्क्यात आहेत.
advertisement
2/7
अभिनेता आणि लेखक सुहेल सेठ यांनी ट्विटरवर संजयच्या मृत्यूची माहिती मिळताच भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय, "संजय कपूरच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. आज सकाळी इंग्लंडमध्ये त्यांनी शांततेत प्राण सोडले. हे एक मोठं नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती."
advertisement
3/7
संजय कपूर हे Sona Comstar या आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपनिचे अध्यक्ष होते. ते एक यशस्वी उद्योजक होते आणि ऑटो इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांना पोलो खेळाची विशेष आवड होती. ते Sona Polo Team चे मालक होते आणि अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत असत.
advertisement
4/7
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं लग्न 2003 मध्ये झालं.जवळपास 11 वर्ष त्यांनी संसार केला. त्यानंतर मात्र त्यांच्यात काही मतभेद झाले त्यामुळे त्यांनी 2014मध्ये डिवोर्स घेतला. समायरा आणि किआन अशी दोन मुलं त्यांना आहेत. डिवोर्सनंतर या दोघांचा करिश्माकडे देण्यात आला.
advertisement
5/7
माहितीनुसार, करिश्माने हे लग्न तिची आई बबिता कपूर हिच्या आग्रहामुळे केलं होतं. मात्र वडील रणधीर कपूर यांना हे लग्न मान्य नव्हतं. लग्नानंतर त्यांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या आणि हे नातं तुटलं. दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले होते.
advertisement
6/7
करिश्मा कपूर डिवोर्स दिल्यानंतर संजय कपूर यांनी मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेव हिच्याशी दुसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. Azarias Kapoor असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. तर करीष्मा मात्र डिवोर्सनंतर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती आजही सिंगल आहे.
advertisement
7/7
NDTV च्या रिपोर्टनुसार, संजय कपूर यूकेतील गार्ड्स पोलो क्लबमध्ये खेळत असताना अचानक गुदमरल्यासारखं वाटू लागलं. त्यांने लगेच खेळ थांबवण्याची विनंती केली आणि मैदानाबाहेर गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांने चुकून मधमाशी गिळली होती आणि तिच्या डंखामुळे त्याच्या घशात सूज आली. याच धक्क्यामुळे त्याला हार्ट अटॅक आला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फक्त हार्ट अटॅक नाही तर करिष्माच्या एक्स नवऱ्याच्या मृत्यूमागे शॉकिंग कारण, मैदानाबाहेर संजीव कपूरसोबत नेमकं काय घडलं?