TRENDING:

'शूट पूर्ण केलं, नंतर सिनेमातून काढलं', मराठी अभिनेत्रीने सांगितला महेश मांजरेकरांसोबत काम करण्याचा अनुभव

Last Updated:
मराठी सिनेसृष्टीतील एक बेधडक, थेट बोलणारी अभिनेत्री जी नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर आपलं परखड मत मांडत असते. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रीय असते आणि मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.
advertisement
1/7
'सिनेमातून काढलं' अभिनेत्रीने सांगितला महेश मांजरेकरांसोबत काम करण्याचा अनुभव
मराठी सिनेसृष्टीतील एक बेधडक, थेट बोलणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. ती नेहमीच कोणत्याही मुद्द्यावर आपलं परखड मत मांडत असते. सोशल मीडियावरही ती बरीच सक्रीय असते आणि मजेदार व्हिडीओ शेअर करत असते.
advertisement
2/7
अशातच क्राती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने महेश मांजरेकरांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला. जो सध्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
3/7
क्रांती रेडकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या कामाविषयी सांगितलं. तिने ‘लालबाग परळ’ या चित्रपटातील काम करण्याचा अनुभव शेअर केला ज्यामध्ये तिचा सीन कापण्यात आला होता.
advertisement
4/7
क्रांती म्हणाली, "‘लालबाग परळ’ या चित्रपटासाठी मी एक भूमिका केली होती. पण मांजरेकर सरांनी थेट सांगितलं 'तुझा रोल मी कापतोय.' त्यांचं म्हणणं होतं की, माझा ट्रॅक कथेत फिट बसत नव्हता. सुरुवातीला ते म्हणाले की एक सीन कापतील, पण नंतर अख्खी भूमिका गायब झाली."
advertisement
5/7
क्रांतीचं यावर एकदम संयमी उत्तर होतं. ती म्हणाली, "माझ्यासाठी ते शिक्षणासारखं होतं. मी एक विद्यार्थिनी म्हणूनच सेटवर होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. अभिनय, परफॉर्मन्स, कम्युनिकेशन... आणि त्यासाठी मला पैसेही मिळाले! म्हणजे मोफत ट्रेनिंगसारखंच."
advertisement
6/7
क्रांतीने यावेळी केदार शिंदे यांच्या काम करण्याच्या शैलीचाही आवर्जून उल्लेख केला. "कॉमेडी म्हणजे निव्वळ गोंधळ नव्हे. पंच नेमका आणि वेळेवर बसलाच पाहिजे, हे मी केदार शिंदेकडून शिकले. 'श्रीमंत दामोदर पंत' हा त्या टायमिंगचं परफेक्ट उदाहरण आहे."
advertisement
7/7
दरम्यान, क्रांती रेडकर 'कोंबडी पळाली' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली. तिची ही भूमिका कोणच कधीही विसरु शकत नाही. या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'शूट पूर्ण केलं, नंतर सिनेमातून काढलं', मराठी अभिनेत्रीने सांगितला महेश मांजरेकरांसोबत काम करण्याचा अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल