...तर 'क्योंकि सास भी कभी बहू थी' सचिन पिळगावकरांची असती', अनेकांना माहिती नाही कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
kyunki saas bhi kabhi bahu thi sachin Pilgaonkar connection : तुम्हाला माहिती आहे का क्योंकि सास भी कभी बहू थी ही मालिका अभिनेते सचिन पिळगावकर यांची असती. या मालिकेचं आणि सचिन पिळगावकर यांचं कनेक्शन फार कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
1/9

क्योंकि सास भी कभी बहू थी ही टेलिव्हिजनची गाजलेली मालिका. तुलसीनं देशभरातली प्रेक्षकांची मनं जिंकली. क्योंकि सास भी कभी बहू थी ही मालिका विश्वातील गाजलेली मालिका आहे आता नव्या सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
2/9
संस्कारी सून आणि तिच्या सासूसोबत असलेलं तिचं नातं अशी कौंटुबिक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण तुम्हाला माहिती आहे का ही कौटुंबिक मालिका कॉमेडी मालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली असती.
advertisement
3/9
एकता कपूर नाही तर क्यूँकी सास भी कभी बहू थी ही मालिका अभिनेते सचिन पिळगावकर यांची असती. ऐकून आश्चर्य वाटलं का! सचिन पिळगावकर यांनी स्वत: याबद्दल सांगितलं.
advertisement
4/9
एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगावकर यांनी हा किस्सा सांगितला. ही मालिका आली त्या काळात सचिन पिळगावकर यांच्या 'तू तू मैं मैं', 'रिन एक दोन तीन', 'हद कर दी' सारख्या कॉमेडी मालिका आल्या होत्या.
advertisement
5/9
'तू तू मैं मैं' मालिका गाजल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी क्यूँकी सास भी कभी बहू थी नावाची कॉमेडी मालिका करायचं ठरवलं. हे नाव देखील त्यांनी पेटंड करून घेतलं.
advertisement
6/9
पण एकता कपूरला तिच्या मलिकेसाठी हे नाव हवं होतं. वडील जितेंद्र यांच्याकडे तिने हे बोलून दाखवलं. तेव्हा जितेंद्र यांनी सचिन पिळगावकर यांना फोन केला आणि भेटायला गेले.
advertisement
7/9
मुलीच्या मालिकेसाठी शिर्षकाचे हक्क देण्यासाठी विचारणा केली. मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकतो कृपया मला त्या शीर्षकाचे राइट्स दे अशी विनंती केली. त्यांनी सचिन यांना मानधन देखील देऊ केले. पण सचिन यांनी ते घेतले नाही.
advertisement
8/9
क्यूँकी सास भी कभी बहु थी मालिका जेव्हा प्रसारित होऊ लागली तेव्हा सुरुवातीच्या अनेक भागामध्ये 'स्पेशल थँक्स टू सचिन पिळगावकर' असे क्रेडिट त्यांना देण्यात येत होतं.
advertisement
9/9
इतकंच नाही तर सचिन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्याबाबतीत देखील असाच दिलदारपणा दाखवला होता. यमला पगला दिवाना या टायटचे हक्क देखील सचिन पिळगावकर यांच्याकडे होते. धर्मेंद्र जेव्हा सिनेमा बनवत होते तेव्हा देखील सचिन यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन, कोणतेही आढेवेढे न घेता यमला पगला दिवानेचे हक्क दिले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
...तर 'क्योंकि सास भी कभी बहू थी' सचिन पिळगावकरांची असती', अनेकांना माहिती नाही कनेक्शन