TRENDING:

99 घरं, 100 एकर जमीन, एकेकाळी 75 रुपये कमावणारा मिका सिंग आज अब्जाधीश! संपत्ती इतकी की विकत घेईल अख्खं शहर

Last Updated:
Mika Singh net worth : मीका सिंग ९९ घरांचा आणि १०० एकर शेतजमिनीचा मालक आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या या अफाट संपत्तीचं गुपित उघड केलं आहे.
advertisement
1/9
99 घरं, 100 एकर जमीन, एकेकाळी 75 रुपये कमावणारा मिका सिंग आज अब्जाधीश!
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या हटके गाण्यांनी सगळ्यांना नाचायला लावणारा गायक मीका सिंग त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या श्रीमंतीसाठीही ओळखला जातो. पण, त्याची संपत्ती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
advertisement
2/9
मीका सिंग ९९ घरांचा आणि १०० एकर शेतजमिनीचा मालक आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या या अफाट संपत्तीचं गुपित उघड केलं आहे.
advertisement
3/9
मीका सिंगने एका मुलाखतीत सांगितलं की, त्याच्याकडे काही स्वस्त आणि काही महागडी घरं आहेत. काही घरं तर त्याच्या गावातही आहेत.
advertisement
4/9
तो म्हणाला, “आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आम्हाला माहीतच नव्हतं की पैशांचं काय करायचं आणि ते कुठे खर्च करायचे. फक्त एकच गोष्ट माहीत होती, ती म्हणजे जमीनदार व्हायचं.”
advertisement
5/9
मीका सिंगने पुढे सांगितलं की, त्याचे आजोबा नेहमी म्हणायचे, “जमीन कधीच धोका देत नाही.” त्यामुळे आयुष्यात त्याने जे काही कमावलं, ते सगळं प्रॉपर्टीमध्येच गुंतवलं.
advertisement
6/9
तो म्हणाला की, फक्त मीच नाही, तर इंडस्ट्रीत अनेक असे गायक आहेत, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. पण, ते महागडे कपडे आणि चार्टर्ड प्लेनवर पैसे उधळतात.
advertisement
7/9
तो म्हणतो, “पैसा कमवायला शिका आणि तो वाचवायलाही शिका. खर्च करा, पण पैशांची पूर्णपणे नासाडी करू नका, ही मूर्खपणाची गोष्ट आहे.”
advertisement
8/9
एका रिपोर्टनुसार, मीका सिंगची एकूण संपत्ती ४१४ कोटी रुपये म्हणजेच ४.१४ अब्ज रुपये आहे. एका कॉन्सर्टसाठी तो २५ ते ५० लाख रुपये घेतो, तर एका गाण्यासाठी १० लाख रुपये कमावतो.
advertisement
9/9
मीका सिंगने सुरुवातीच्या दिवसांत खूप संघर्ष केला आहे. एकेकाळी तो फक्त ७५ रुपये कमवत होता, पण आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
99 घरं, 100 एकर जमीन, एकेकाळी 75 रुपये कमावणारा मिका सिंग आज अब्जाधीश! संपत्ती इतकी की विकत घेईल अख्खं शहर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल