TRENDING:

53 वर्षांचा मिलिंद सोमण, 27 वर्षांची अंकिता; कुठे भेटलं हे फिटनेस फ्रिक कपल, फिल्मी आहे Love Story

Last Updated:
Milind Soman - Ankita Konwar Love Story : मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिताशी 2018 मध्ये लग्न, फिटनेस आणि प्रेमकहाणीमुळे दोघेही सतत चर्चेत आहेत.
advertisement
1/8
53 वर्षांचा मिलिंद सोमण, 27 वर्षांची अंकिता; फिल्मी आहे Love Story
90च्या दशकात स्टार असलेले मिलिंद सोमण आजही फिटनेसमध्ये टफ फाइट देतात. वयाच्या साठीतही तरूणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे.
advertisement
2/8
फिटनेसव्यतिरिक्त मिलिंद सोमण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. त्यांनी केलेल्या लग्नाची तर खूपच चर्चा रंगली. मिलिंद यांचं वय आता 59वर्ष आहे तर अंकिता 33 वर्षांची आहे. दोघांनी लग्न केलं तेव्हा मिलिंद 53 वर्षांचे आणि अंकिता 27 वर्षांची होती. दोघांनी फिल्मी लव्हस्टोरी माहितीये!
advertisement
3/8
मिलिंद सोमण यांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर त्यांच्यापेक्षा लहान वयाच्या मुलीशी लग्न केलं.  26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी लग्न केल्याची बातमी आली सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. सगळ्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता.
advertisement
4/8
मिलिंद आणि अंकिताची प्रेमकहाणी हळूहळू पुढे सरकली. त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. असं म्हटले जातं की मिलिंदने स्वतः अंकिताला त्यांचं प्रेम व्यक्त करण्याचं धाडस केलं होतं. मिलिंदने अनेक वेळा त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे.
advertisement
5/8
एका मुलाखतीत बोलताना मिलिंद म्हणाले होतं की, मी स्वतःला अंकिताच्या वयाचा समजतो. दोघांमध्ये खूप चांगलं नातं आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेतो. वयाच्या या टप्प्यावरही  स्वतःला अंकितापेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त मानतो.
advertisement
6/8
मिलिंद आणि अंकिता यांनी 2018 मध्ये लग्न केलं. दोघेही लग्नापूर्वी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही एका नाईट क्लबमध्ये भेटले. मिलिंदला पहिल्याच नजरेत अंकिताच्या प्रेमात पडला. पण त्यावेळी अंकिता  रिलेशनशिपमध्ये होती.
advertisement
7/8
अंकिताच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतरच मिलिंद आणि अंकिता यांच्यात मैत्री झाली. अंकिताच्या वाईट काळात मिलिंदने तिला खूप साथ दिली, तिची काळजी घेतली आणि ही मैत्री लवकरच प्रेमात बदलली. दोघांचं प्रेम अखेर लग्नापर्यंत पोहोचलं.
advertisement
8/8
मिलिंद आणि अंकिता दोघेही फिटनेसबाबत खूप सीरियस आहेत. मिलिंद सोमण 60व्या 35 वर्षांचे दिसतात. आजही मिलिंद त्यांच्या लूकमुळे अनेकदा चर्चेत असतात. मिलिंद आणि अंकिताची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
53 वर्षांचा मिलिंद सोमण, 27 वर्षांची अंकिता; कुठे भेटलं हे फिटनेस फ्रिक कपल, फिल्मी आहे Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल