Nana Patekar: 15 दिवसांसाठी तब्बल 20 कोटी! नाना पाटेकरांनी नाकारली मोठी ऑफर, कारण काय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nana Patekar: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी जागा बनवणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी प्रत्येक भूमिकेची प्रेक्षकांवर छाप सोडली.
advertisement
1/7

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी जागा बनवणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी प्रत्येक भूमिकेची प्रेक्षकांवर छाप सोडली.
advertisement
2/7
नाना पाटेकरांविषयी नुकतीच एक बातमी समोर आलीय ज्यामध्ये त्यांनी चक्क 20 कोटींचा प्रस्ताव नाकारला. 15 दिवसांसाठी त्यांना एवढी कोट्यवधींची रक्कम मिळत असतानाही त्यांनी नकार दिला. हे प्रकरण नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/7
नाना पाटेकरांचा हा किस्सा एस.एस.राजामौली यांच्याशी संबंधित आहे. राजामौली सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट SSMB29 मुळे चर्चेत आहेत. या बिग बजेट सिनेमात महेश बाबू आणि बऱ्याच वर्षांनी भारतीय सिनेमात परतणारी प्रियांका चोप्रा झळकणार आहेत.
advertisement
4/7
चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरू आहे. पण एक किस्सा चर्चेत आहे. राजामौली यांनी ‘नाना पाटेकर’ यांना खास भेटून एक मोठी भूमिका ऑफर केली होती, ती देखील थेट त्यांच्या फार्महाऊसवर जाऊन.
advertisement
5/7
राजामौली पुण्यातील नाना पाटेकर यांच्या फार्महाऊसवर गेले होते. त्यांनी महेश बाबूच्या वडिलांची भूमिका ऑफर केली होती. फक्त 15 दिवसांचं शूट, आणि मानधन थेट 20 कोटी रुपये. पण नानांनी नका दिला.
advertisement
6/7
नकार देण्याचं कारण म्हणजे, ते म्हणाले “ही भूमिका मला फारशी भिडली नाही”, ते रोलमध्ये स्वतःला गुंतवू शकणार नाहीत, असं त्यांचं मत होतं. नानांनी नकार दिल्याची ही चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, हा प्रस्ताव स्वीकारला असता तर नाना पाटेकर येणाऱ्या भारताच्या सर्वात महागड्या चित्रपटाचा भाग झाले असते! SSMB29 चं बजेट तब्बल 1000 कोटी रुपये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nana Patekar: 15 दिवसांसाठी तब्बल 20 कोटी! नाना पाटेकरांनी नाकारली मोठी ऑफर, कारण काय?