TRENDING:

'ज्यांना माहीत आहे तेच...', सोहम बांदेकरसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली पूजा बिरारी

Last Updated:
Pooja Birari-Soham Bandekar : गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात एक बातमी जोरदार चर्चेत होती, ती म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर लवकरच लग्न करणार आहेत.
advertisement
1/8
सोहम बांदेकरसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली पूजा बिरारी
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात एक बातमी जोरदार चर्चेत होती, ती म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर लवकरच लग्न करणार आहेत.
advertisement
2/8
या दोघांमध्ये प्रेम आहे आणि ते लग्नबंधनात अडकणार आहेत, अशा वावड्या उठल्या होत्या. पण आता या चर्चांवर पूजा बिरारीने एक सूचक पोस्ट शेअर करून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
3/8
सोहम आणि पूजा यांनी कधीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत, ना सोशल मीडियावर एकमेकांबद्दल काही पोस्ट केली. तरीही त्यांच्या लग्नाच्या बातम्या वेगाने पसरल्या. यामुळे पूजा खूप नाराज झाली असल्याचं दिसतं. याच नाराजीमुळे तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
advertisement
4/8
पूजाने तिच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे, “ज्याला खरं माहीत आहे, तोच शांत राहतो. बाकीच्यांना काहीच माहिती नाही, पण तेच जास्त बोलतात आणि सगळ्यांना सांगतात.”
advertisement
5/8
पूजाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होतं की, ती आणि सोहम रिलेशनशिपमध्ये नाहीत आणि त्यांच्या लग्नाची बातमी फक्त एक अफवा आहे.
advertisement
6/8
सोहम बांदेकर हा लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. तो सध्या त्याच्या आई-वडिलांच्या निर्मिती संस्थेचं काम पाहतो. 'ठरलं तर मग' या गाजलेल्या मालिकेच्या निर्मितीची जबाबदारी सोहम सांभाळत आहे.
advertisement
7/8
दुसरीकडे, पूजा बिरारीही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरीची मुख्य भूमिका साकारत आहे.
advertisement
8/8
काहीही आधार नसताना एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा बातम्या पसरल्यामुळे पूजा नाराज झाली असल्याचं दिसतं. तिने तिच्या पोस्टमधून अशा लोकांसाठी एक स्पष्ट संदेश दिला आहे, जे खोट्या बातम्या पसरवतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ज्यांना माहीत आहे तेच...', सोहम बांदेकरसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलली पूजा बिरारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल