Priya Marathe: 2 वर्ष छोट्या पडद्यापासून दूर, अभिनयासोबत 'या' क्षेत्रात काम करत होती प्रिया मराठे!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priya Marathe: मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आज आपण गमावला आहे. अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती मात्र अखेर तिची झुंज अपयशी ठरली.
advertisement
1/7

मराठी आणि हिंदी मालिकाविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा आज आपण गमावला आहे. अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं आहे. प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती मात्र अखेर तिची झुंज अपयशी ठरली.
advertisement
2/7
31 ऑगस्ट रोजी मीरारोड येथील निवासस्थानी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. गेली दोन वर्षे ती कर्करोगाशी झुंज देत होती. डॉक्टरांच्या उपचारांना शरीराने साथ सोडली आणि तिची जीवनयात्रा थांबली.
advertisement
3/7
प्रियाचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. एका साध्या मुलीपासून टीव्ही स्टार, नाटकांची अभिनेत्री आणि यशस्वी उद्योजिका असा तिचा प्रवास अनेकांसाठी धडा ठरावा असा होता. ती प्रसिद्द अभिनेत्री तर होतीच याशिवाय तिने एक चांगली उद्योजिकादेखील होती.
advertisement
4/7
प्रियाचा मीरारोड येथे एक कॅफे होता. The Bombay Fries म्हणून तिने कॅफे सुरु केला होता. प्रिया मराठेने तिचा पती अभिनेता शंतनू मोघेसोबत मिळून हा कॅफे सुरु केला होता.
advertisement
5/7
प्रियाने ‘या सुखांनो या’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ अशा मालिकांतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या अभिनयातल्या सहजतेमुळे आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे ती पटकन घराघरात पोहोचली.
advertisement
6/7
मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिने आपला ठसा उमटवला. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
advertisement
7/7
विशेष म्हणजे, तिने अनेक वेळा खलनायिकेच्या भूमिका साकारल्या, पण तिचा तो स्क्रीनवरील निगेटिव्ह अंदाजही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. नाटकांमध्येही तिचा वावर तितकाच प्रभावी होता. ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमधून तिने रंगभूमीवरही आपली कला दाखवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe: 2 वर्ष छोट्या पडद्यापासून दूर, अभिनयासोबत 'या' क्षेत्रात काम करत होती प्रिया मराठे!