TRENDING:

Rishi Kapoor: 'मी तुला KISS करणार नाही..' मुलीच्या एका वाक्याने बदललं होतं ऋषी कपूर यांचं आयुष्य, नेमकं काय घडलेलं?

Last Updated:
Rishi Kapoor: बॉलिवूडच्या रोमँटिक हिरोंमध्ये ऋषी कपूर यांचे नाव कायम लक्षात राहील. 70-80 च्या दशकात लाखो मुलींचे क्रश असलेले ऋषी, पडद्यामागे मात्र साधे, हसरे आणि काही वाईट सवयींनी ग्रासलेले व्यक्तिमत्त्व होते.
advertisement
1/7
'मी तुला KISS करणार नाही..' मुलीच्या एका वाक्याने बदललं होतं ऋषी यांचं आयुष्य
बॉलिवूडच्या रोमँटिक हिरोंमध्ये ऋषी कपूर यांचे नाव कायम लक्षात राहील. 70-80 च्या दशकात लाखो मुलींचे क्रश असलेले ऋषी, पडद्यामागे मात्र साधे, हसरे आणि काही वाईट सवयींनी ग्रासलेले व्यक्तिमत्त्व होते.
advertisement
2/7
ऋषी कपूरच्या लेकीने एकदा त्यांना किस करण्यास नकार दिला होता. तिने सांगितलं होतं की तुमच्या तोंडाचा खूप वास येतोय. या गोष्टीचा उल्लेख ऋषी कपूर यांच्या आत्मचरित्रात 'खुल्लम खुल्ला' मध्येही करण्यात आला आहे.
advertisement
3/7
ऋषीची मुलगी रिद्धिमा लहान असताना एके सकाळी म्हणाली “तुझ्या तोंडाला दुर्गंधी येतोय, मी तुला किस करणार नाही.” ते वाक्य ऐकताच ऋषींनी सिगारेट कायमची सोडली. त्या दिवसानंतर त्यांनी कधीही सिगारेटला हात लावला नाही.
advertisement
4/7
1952 मध्ये राज कपूर यांच्या घरी जन्मलेल्या ऋषी यांनी लहानपणीच “मेरा नाम जोकर” मध्ये काम केलं आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. पण खरी स्टारडम मिळाली “बॉबी” (1973) मधून. त्या चित्रपटाने त्यांना रातोरात रोमँटिक हिरो बनवलं.
advertisement
5/7
“कर्ज”, “प्रेम रोग”, “चांदनी”, “नगीना”, “अमर अकबर अँथनी” असे हिट्स देत ऋषी कपूर यांनी तीन दशकं बॉलीवूडवर राज्य केलं. ऋषी कपूर फक्त रोमँटिक हिरो राहिले नाहीत. वयानुसार “अग्निपथ”, “कपूर अँड सन्स”, “102 नॉट आउट” मध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. जवळपास 150 हून अधिक चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
advertisement
6/7
कुटुंबाच्या बाबतीत ते कडक होते. मुलगा रणबीरसोबत ते मित्रासारखे राहू शकले नाहीत, हे त्यांनी स्वतः मान्य केलं. पण रणबीर वेगळा बाप बनेल यावर त्यांचा विश्वास होता.
advertisement
7/7
2018 मध्ये त्यांना कर्करोग झाला. उपचारासाठी ते न्यूयॉर्कमध्ये गेले आणि तिथून परत आल्यानंतर पुन्हा काम सुरूही केलं. पण आजाराने त्यांना जास्त वेळ दिला नाही. 30 एप्रिल 2020 रोजी ते आपल्यातून निघून गेले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rishi Kapoor: 'मी तुला KISS करणार नाही..' मुलीच्या एका वाक्याने बदललं होतं ऋषी कपूर यांचं आयुष्य, नेमकं काय घडलेलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल