TRENDING:

Riteish Deshmukh on Ajit Pawar Death : 'ही मोठी हानी...' अजित दादांच्या निधनाच्या बातमीने रितेश देशमुखला धक्का, भावनिक पोस्ट

Last Updated:
Riteish Deshmukh on Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनाने महाराष्ट्र शोकाकुळ झाला. रितेश देशमुखने भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आणि पवार कुटुंबीयांना संवेदना व्यक्त केल्यात.
advertisement
1/7
'ही मोठी हानी...' अजित दादांच्या निधनाच्या बातमीने रितेश देशमुखला धक्का
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. बारामतीमध्ये प्रचाराला जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. अजित पवारांसह विमानातील इतर सहा जणांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
2/7
फक्त राजकीय नाही तर मनोरंजन विश्वातही दादांचे सलोख्याने संबंध होते. अजित दादांच्या निधनाची माहिती समोर येताच अभिनेता रितेश देशमुख याने पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. रितेशनं अजित दादांना श्रद्धांजली वाहिली.
advertisement
3/7
रितेशनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "अजित दादांना एका दुर्दैवी अपघातात गमावल्याची बातमी ऐकून धक्का बसला. हृदय हेलावून गेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान नेत्यांपैकी ते एक होते."
advertisement
4/7
"कामात हलगर्जीपणा त्यांना अजिबात मान्य नव्हता आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला उत्तम काम करण्यासाठी ते सतत प्रेरित करायचे. ते कधीही शब्द मोजून बोलले नाहीत. त्यांचा हजरजबाबीपणा अप्रतिम होता आणि संपूर्ण राज्याचं त्यांच्यावर भरभरून प्रेम होतं."
advertisement
5/7
रितेशनं पुढे लिहिलंय, "त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला होता आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमळ वागणुकीसाठी ते माझ्या कायम आठवणीत राहतील. पवार कुटुंबीय, त्यांचे जवळचे आणि कोट्यवधी समर्थक यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना."
advertisement
6/7
रितेशनं अजित दादा आणि दिवंगत मुख्यमंत्री, रितेशचे वडिल विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे.  विलासराव देशमुख ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा अजित पवार त्यांच्या मंत्रीमंडळात होते. शेवटच्या काही वर्षात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
advertisement
7/7
विलासराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर अजित पवारांचे देशमुख कुटुंबाशी चांगले संबंध राहिले. रितेश देशमुख आणि अजित दादा यांचे चांगले संबंध होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Riteish Deshmukh on Ajit Pawar Death : 'ही मोठी हानी...' अजित दादांच्या निधनाच्या बातमीने रितेश देशमुखला धक्का, भावनिक पोस्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल