Shakti Kapoor Birthday: 3 दिवस उपाशी, प्रसिद्ध अभिनेत्याने घातलं जेवायला; शक्ती कपूर कसे बनले 'क्राइम मास्टर गोगो'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Shakti Kapoor Birthday: शक्ती कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्यांनी खलनायक आणि विनोदी अभिनेता अशा दोन्ही भूमिकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. गेली चार दशके त्यांनी बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
1/7

शक्ती कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे नाव आहे, ज्यांनी खलनायक आणि विनोदी अभिनेता अशा दोन्ही भूमिकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. गेली चार दशके त्यांनी बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
advertisement
2/7
शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस आहे. ते 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात. श्रद्धा कपूरचे वडील बॉलिवूडचे खलनायक आणि कॉमेडियन कसे बनले? त्यांचा प्रवास कसा होता?
advertisement
3/7
शक्ती कपूर मुंबईत नवखे असताना कामाच्या शोधात भटकत होते. तीन दिवस उपाशी राहिल्यानंतर ते सुनील दत्त यांच्या अजंता आर्ट्स प्रॉडक्शन ऑफिसमध्ये पोहोचले. सुनील दत्त यांनी त्यांना पाहताक्षणी विचारलं, “जेवण केलं आहेस का?” शक्तीने स्वतःची भूक लपवत होकार दिला. मात्र सुनील दत्त यांना लगेच लक्षात आलं की हा मुलगा उपाशी आहे. त्यांनी प्रेमाने बसवून जेवण दिलं आणि मनापासून काळजी घेतली. हा क्षण शक्ती कधीच विसरू शकले नाहीत.
advertisement
4/7
त्यावेळी शक्ती कपूर यांनी सुनील दत्त यांना खोटं सांगितलं की तो अजून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. प्रत्यक्षात त्यांनी काही लहान भूमिका केलेल्या होत्या. पण हीच भेट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली. याच संधीमुळे त्यांना संजय दत्तच्या डेब्यू चित्रपट ‘रॉकी’ मध्ये भूमिका मिळाली.
advertisement
5/7
शक्ती कपूरने आतापर्यंत 700 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. खलनायक म्हणून त्यांनी अनेक धमाकेदार भूमिका साकारल्या, तर कॉमेडीत त्यांचा क्राइम मास्टर गोगो आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
advertisement
6/7
शक्ती कपूर यांचे मूळ नाव सुनील सिकंदरलाल कपूर आहे. अभिनयात येण्यापूर्वी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दिग्दर्शक सुनील दत्त यांनी 'रॉकी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांचे नाव सुनील कपूरवरून बदलून 'शक्ती कपूर' असे ठेवले.
advertisement
7/7
आज त्यांची मुलगी श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री 2’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. श्रद्धालाही तिच्या वडिलांचं ‘गोगो’ पात्र फार आवडतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shakti Kapoor Birthday: 3 दिवस उपाशी, प्रसिद्ध अभिनेत्याने घातलं जेवायला; शक्ती कपूर कसे बनले 'क्राइम मास्टर गोगो'