Sonalee Kulkarni : 'अफवा आणि चर्चांवर किती विश्वास ठेवावा', राज-उद्धव भेटीवर स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonalee Kulkarni on Raj-Uddhav Thackeray Reunion : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं हिनं प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणाली सोनाली.
advertisement
1/8

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू भेट आणि युतीची चर्चा आहे. आधी मराठी भाषेच्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.
advertisement
2/8
तब्बल 19 वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी राज स्वत: मातोश्रीवर गेले होते.
advertisement
3/8
त्यानंतर आता गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर सहकुटुंब दाखल झाले होते. ठाकरे बंधूच्या भेटीला सिलसिला आणि त्यामागची क्युरिओसिटी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
advertisement
4/8
सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळी देखील या भेटीकडे लक्ष लावून आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ठाकरे बंधू भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
5/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालं. यानिमित्तानं मुंबई तकशी बोलताना सोनाली म्हणाली, "हे खूप हायपोथेटिकल आहे. असं होत असेल तर ते महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीसाठी उत्तम ठरेल असं वाटतंय."
advertisement
6/8
"भाषेवरचा, प्रांतावरचा आणि जातिवाद या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, घडू नयेत. तरीही आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न आपण केले पाहिजेत असंही वाटतं."
advertisement
7/8
सोनाली पुढे म्हणाली, "ते औपचारिक घोषणा करत नाहीत तोपर्यंत सगळ्या अफवा आणि चर्चांवर किती विश्वास ठेवावा हे प्रश्नार्थी आहे."
advertisement
8/8
"पण महाराष्ट्राची संस्कृती, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसाठी हे चांगलं असेल तर ते नक्कीच व्हावं आणि कायमस्वरुपी व्हावं."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonalee Kulkarni : 'अफवा आणि चर्चांवर किती विश्वास ठेवावा', राज-उद्धव भेटीवर स्पष्टच बोलली सोनाली कुलकर्णी