Sunil Barve Birthday : ज्या मुलीनं नाकारलं आज तिच आहे सुनील बर्वेची अर्धांगिनी; अभिनेत्याची 30 वर्ष जुनी रंजक लव्हस्टोरी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सहकुटुंब सहपरिवार फेम अभिनेता सुनील बर्वे आज त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी इंडस्ट्रीतील या चॉकलेट बॉयची लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?
advertisement
1/7

मराठी,हिंदी, गुजराती नाट्य आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता सुनील बर्वे. 'आई', 'गोजिरी', 'जमलं हो जमलं', 'तू तिथे मी', 'लपंडाव', 'अस्तित्व', 'लग्नाची बेडी', 'झोपी गेलेला जागी झाला', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'सहकुटुंब सहपरिवार' सारख्या मराठी, नाटक आणि मालिकांमधूनअभिनेता सुनील बर्वेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/7
मराठी सिनेसृष्टीतील रूबाबदार, देखणा, गोरा गोमटा अभिनेता म्हणून सुनीलची क्रेझ आजही कायम आहे. याच गोऱ्यागोमट्या, चॉकलेट बॉय अभिनेत्याची लव्ह स्टोरी माहितीये का?
advertisement
3/7
अभिनेता सुनील बर्वेनं मुंबईतील पाटकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे.सुनीलची बायको त्याच्यापेक्षा एका वर्षानं लहान आहे.
advertisement
4/7
पाटकर कॉलेजमध्ये एक विश्वास नावाचं हॉटेल आहे. कॉलेजच्या हॉटेलमध्ये सुनीलची बायको अर्पणा ही तिच्या मैत्रिणीची वाढदिवस साजरा करत होती. तेव्हा सुनीलनं तिला पहिल्यांदा पाहिलं होतं.
advertisement
5/7
अर्पणानं तिच्या हातात तिच्या नावाचं ब्रेसलेट घातलं होतं. त्यावरून तिचं नाव अपर्णा असल्याचं सुनीलला कळलं होतं.
advertisement
6/7
त्यानंतर सुनीलनं अपर्णाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण अर्पणानं आधी नकार दिला. पण सुनीलनं त्याचे प्रयत्न थांबवले नाहीत आणि अपर्णाबरोबर मैत्री केली. त्यांची मैत्री पुढे जाऊन प्रेमात रूपांतरीत झाली.
advertisement
7/7
दोघांच्या लग्नाला आता 30हून अधिक वर्ष झालीत. दोघांना सानिका आणि अर्थव अशी दोन मुलं आहे. मुलगी सानिकाचं लग्न देखील झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sunil Barve Birthday : ज्या मुलीनं नाकारलं आज तिच आहे सुनील बर्वेची अर्धांगिनी; अभिनेत्याची 30 वर्ष जुनी रंजक लव्हस्टोरी