Govinda-Sunita Ahuja: गोविंदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनीता मरण्यासही होती तयार, म्हणाली, 'त्याला मुलगा..'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Govinda-Sunita Ahuja: बॉलीवूडचा 'हिरो नंबर वन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटात्या चर्चांनी जोर धरला आहे.
advertisement
1/7

बॉलीवूडचा 'हिरो नंबर वन' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटात्या चर्चांनी जोर धरला आहे.
advertisement
2/7
अलीकडे समोर आलेल्या माहिती नुसार, सुनीता आहुजाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. याशिवाय त्यांनी गोवंदावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. मात्र अद्याप याविषयी अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
advertisement
3/7
1987 मध्ये गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न झालं. पुढच्याच वर्षी मुलगी टीना आहुजाचा जन्म झाला. जवळपास दहा वर्षांनी सुनीता पुन्हा आई बनली आणि मुलगा यशवर्धनच्या जन्माने कुटुंब पूर्ण झाले. मात्र यशवर्धनच्या जन्मावेळी गोविंदासाठी सुनीता मरण्यासाठीही तयार होत्या.
advertisement
4/7
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाल्या, "त्या वेळी माझे वजन खूप वाढले होते. डॉक्टर म्हणत होते, प्रसूती धोकादायक आहे. मला वाटले की मी वाचणार नाही. मी डॉक्टरांना विनंती केली, ‘मुलाला वाचवा, माझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे. मी मेलो तरी चालेल.’ हे ऐकून गोविंदा इतका रडला की आजही तो क्षण विसरता येत नाही."
advertisement
5/7
दरम्यान, मागच्या काही दिवसांत सुनीता आहुजाने वांद्रे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी गाजली. लगेचच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र गोविंदाचे वकील ललित बिंद्रा यांनी स्पष्ट केले की ही जुनी बाब आहे आणि आता सर्व काही मिटले आहे.
advertisement
6/7
याआधीही त्यांच्या नात्यातील अंतरावरून अनेकदा चर्चेला उधाण आले होते. काही काळापूर्वी सुनीताने उघड केले होते की गेल्या 12 वर्षांपासून ती आपला वाढदिवस एकटी साजरा करत आहे. कामाच्या व्यापामुळे आणि वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचेही ती म्हणाली.
advertisement
7/7
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांची प्रेमकहाणी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सुरू झाली. सुनीता ही गोविंदाच्या मामाची मुलगी होती. त्यांच्यात प्रेम फुलले आणि त्यांनी गुप्तपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1987 मध्ये त्यांनी एका मंदिरात अत्यंत साधेपणाने लग्न केले. पण गोविंदाचे करिअर नुकतेच सुरू झाल्यामुळे त्यांनी हे लग्न जवळपास एक वर्ष जगापासून लपवून ठेवले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda-Sunita Ahuja: गोविंदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुनीता मरण्यासही होती तयार, म्हणाली, 'त्याला मुलगा..'