पैशांची होती अडचण, आईनं असा जुगाड करून तयार केला सुष्मिताचा तो Miss Universe Winning Gown
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री सुष्मिता सेननं अवघ्या 18 व्या वर्षी भारताची मिस यूनिवर्स होण्याचा बहुमान पटकवला. तिनं मिस यूनिवर्ससाठी घातलेला गाऊन खूप चर्चेत आला होता. त्या सुंदर गाऊनची इनसाइड स्टोरी कदाचित तुम्हाला माहिती नसेल.
advertisement
1/10

माजी मिस युनिवर्स अर्थात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन. 21 मे 1994 साली सुष्मितानं मिस यूनिवर्सचा किताब आपल्या नावे केला होता.
advertisement
2/10
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सुष्मितानं हे यश मिळवलं होतं. सुष्मिताच्या या यशामागे तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. तिला स्टेजवर उभं करण्यापासून ते तिचा विनिंग गाऊन तयार करण्यापर्यंत.
advertisement
3/10
अभिनेत्री सुष्मिता सेन तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुष्मितानं मिस यूनिवर्ससाठी घातलेल्या त्या गाऊनची पुढे जाऊन स्टाइल झाली.
advertisement
4/10
सुष्मिताचा स्टायलिश गाऊन कोणत्याही मोठ्या डिझाइनरनं नाही तर दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमधील एका साध्या टेलरनं शिवला होता.
advertisement
5/10
सुष्मितानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "जेव्हा मी मिस इंडियासाठी गेले होते तेव्हा माझ्याकडे आमच्या फारसे पैसे नव्हते. डिझाइनर कपडे काय असतात हे आम्हाला माहिती देखील नव्हतं. मला 4 कॉस्ट्युम्स हवे होते".
advertisement
6/10
"आम्ही मध्यमवर्गीय लोक होतो. माझी आई मला म्हणाली, लोक तुझे कपडे बघायला नाहीतर तुला बघायला येणार आहेत. आपण सरोजनी मार्केटला कपडे घ्यायला जाऊया".
advertisement
7/10
"आई मला घेऊन सरोजनी मार्केटला गेली. तिथे एका गॅरेजच्या खाली एक पेटिकोट शिवणारा साधा टेलर होता. त्याला आईने सांगितलं की, मुलगी हा ट्रेस घालून टीव्हीवर दिसणार आहे त्यामुळे तशाप्रकारे ड्रेस शिवून द्या. त्या साध्या टेलरनं माझा व्हाइट रंगाचा विनिंग गाऊन शिवला होता".
advertisement
8/10
सुष्मितानं ड्रेसच्या डिझाइनबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "आई उरलेला कापड घरी घेऊन आली. त्या कापडाचं तिनं फुल तयार केलं आणि ते माझ्या ड्रेसवर लावलं".
advertisement
9/10
"नंतर तिनं ब्रँड न्यू सॉक्स खरेदी केले आणि ते मध्ये कापले आणि त्याला इलास्टिक लावून त्याचे गोल्व्स तयार केले".
advertisement
10/10
"तो ड्रेस मी घातला आणि त्या दिवशी मिस इंडियाचा किताब जिंकली. माझ्यासाठी तो खूप मोठा दिवस होता", असं सुष्मितानं सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पैशांची होती अडचण, आईनं असा जुगाड करून तयार केला सुष्मिताचा तो Miss Universe Winning Gown