‘सर नाकातून रक्त काढून दाखवा’, स्वप्निल जोशी अखेर त्या ट्रोलिंगवर पहिल्यांदा बोलला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
swapnil joshi on duniyadar nakatun rakta kadhun dakhva scene: दुनियादारी सिनेमात श्रेयस म्हणजेच स्वप्निल जोशीच्या नाकातून रक्त येतं तो सीन प्रचंड व्हायरल झालेला आहे. त्यावरून अनेकदा स्वप्निलला ट्रोल देखील केलं जातं. या ट्रोलिंगवर अखेर स्वप्निलनं उत्तर दिलं आहे.
advertisement
1/9

अभिनेता स्वप्निल जोशी हा मराठी इंडस्ट्रीत मागील अनेक वर्षांपासून सातत्यानं काम करत आहे. चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला स्वप्निल आता व्हिलनच्या भूमिकेतही दिसू लागला आहे.
advertisement
2/9
स्वप्निल जोशीचा दुनियादारी हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमात स्वप्नील खऱ्या अर्थाने चॉकलेट बॉय म्हणून दिसला होता. स्वप्नीलच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सिनेमामुळे तो आजही ट्रोल होतो.
advertisement
3/9
स्वप्नीलने श्रेयस ही भूमिका सिनेमात साकारली होती. सिनेमातील शेवटच्या सीनमध्ये श्रेयस आणि श्रीरिनचा रोमँटीक पण तितकाच भावुक करणारा सीन आहे. ज्यात दोघे बोलत असताना अचानक श्रेयसच्या नाकातून रक्त येतं.
advertisement
4/9
हा सीन प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतला की आज 10-15वर्षांनीही त्या सीनवर अनेक मिम्स बनतात. स्वप्नील जोशीला यामुळे नाकातून रक्त काढून दाखवा म्हणत नेहमीच ट्रोल केलं गेलं आहे.
advertisement
5/9
स्वप्निल जोशीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओच्या कमेंटमध्ये नाकातून रक्त काढून दाखवा ही कमेंट असते. या ट्रोलिंगवर अखेर अनेक वर्षांनी स्वप्नीलने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
6/9
द डेंट ऑड इंजिनिअर या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्वप्निल म्हणाला, "कोणतीच पोस्ट नाही त्याखाली ही कमेंट येत नाही. मला भारी वाटलं."
advertisement
7/9
"दहापेक्षा अधिक वर्ष झाली दुनियादारीला. 2 मिनिटांचा जमाना आहे. मॅगी सुद्धा 2 मिनिटात बनते. तिथे जर 15 वर्ष जुनी एक आठवण काल परवा इतकी ताजी होत असेल तर त्या चित्रपटाने तरूणाईवर किती मोठा इम्पॅक्ट केला असेल."
advertisement
8/9
"जेव्हा जेव्हा मला कोणी म्हणत की नाकातून रक्त काढून दाखव तेव्हा तेव्हा मला आठवत की दुनियादारी किती मोठा हिट होता"
advertisement
9/9
स्वप्निल पुढे म्हणाला, "अजूनही त्यांना जर दुनियादारीतला श्रेयस आठवत असेल तर ... जिथे कालचं आठवत नाही आपल्याला. त्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार त्यांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं, करत आहेत मी खूप आभारी आहे. "
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
‘सर नाकातून रक्त काढून दाखवा’, स्वप्निल जोशी अखेर त्या ट्रोलिंगवर पहिल्यांदा बोलला