TRENDING:

Usha Nadkarni : 'तिने मला चपलेने मारलं असतं...', कोणाच्या भीतीने उषा नाडकर्णींनी नाकारली बिग बॉस हिंदीची ऑफर?

Last Updated:
Usha Nadkarni Refused Bigg Boss Hindi Offer : अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी 'बिग बॉस मराठी'चा अनुभव सांगताना हिंदी 'बिग बॉस'साठी दोनदा विचारण्यात आलं होतं पण त्यांनी नकार दिला.
advertisement
1/7
'तिने मला चपलेने मारलं असतं...', उषा नाडकर्णींनी नाकारली बिग बॉस हिंदीची ऑफर
मुंबई: मराठी आणि हिंदी कलाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा, अभिनेत्री उषा नाडकर्णी त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेही ओळखल्या जातात. 'पवित्र रिश्ता' मालिकेतील त्यांची 'आऊ'ची भूमिका खूप गाजली.
advertisement
2/7
‘बिग बॉस मराठी’मध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. पण आता त्यांनी हिंदी 'बिग बॉस' बद्दल एक खूप मोठा आणि रंजक खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच थक्क झाले आहेत.
advertisement
3/7
‘बिग बॉस मराठी’चा अनुभव सांगताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, “'मराठी बिग बॉस'मधून ज्या दिवशी मी घरी गेले, तेव्हा मी पूर्ण वेडी झाले होते."
advertisement
4/7
"माझा घरचा गॅस ऑटोमॅटिक आहे की लायटरने चालू होतो, हे सुद्धा मला आठवत नव्हतं. फोन कसा वापरायचा हे पण मी विसरून गेले होते. माझा स्वतःचा नंबर मला आठवत नव्हता.”
advertisement
5/7
उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हा खुलासा केला. त्या म्हणाल्या, “मला हिंदी 'बिग बॉस'साठी दोनदा विचारण्यात आलं होतं. पण मी त्यांना ‘नाही’ म्हणाले."
advertisement
6/7
"कारण तेव्हा मी 'पवित्र रिश्ता' या मालिकेत काम करत होते. जर मी मालिका सोडून 'बिग बॉस'मध्ये गेले असते, तर निर्माती एकता कपूरने मला चपलेने मारलं असतं!”
advertisement
7/7
दरम्यान, मराठी बिग बॉसच्या पहिल्याच ‘एलिमिनेशन टास्क’मध्ये ४-५ जणांनी त्यांचं नाव घेतलं होतं. त्याबद्दल त्या म्हणाल्या, “माझं कोणाशीही भांडण नव्हतं. तरीही त्यांनी माझं नाव घेतलं. तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि माझा विचार करून बीपी वाढला. पहिल्याच दिवशी मला रुग्णालयात घेऊन जावं लागलं होतं.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Usha Nadkarni : 'तिने मला चपलेने मारलं असतं...', कोणाच्या भीतीने उषा नाडकर्णींनी नाकारली बिग बॉस हिंदीची ऑफर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल