TRENDING:

Ganesh Chaturthi : गणेशपूजना दरम्यान वाहिली जातात 21 प्रकारची पानं, जाणून घ्या त्यांचं महत्व!

Last Updated:
मंगळागौर, हरतालिका देवींच्या पूजनामध्ये पत्री म्हणजे झाडांची पाने अर्पण करण्याची पद्धत आपल्या  हिंदू धर्मात आहे. गणेश पूजनादरम्यानसुद्धा अशाच प्रकारे 21 प्रकारच्या पत्री वाहतात. तेव्हा या 21 प्रकारच्या पानांचे महत्व जाणून घेऊयात. (डॉ . मनिषा अनारसे-बनकर आयुर्वेदाचार्य, संचालिका, डॉ. बनकर संजीवनी आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर).
advertisement
1/21
गणेशपूजना दरम्यान वाहिली जातात 21 प्रकारची पानं, जाणून घ्या त्यांचं महत्व!
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna) : अर्जुन या वृक्षाची साल आयुर्वेदामध्ये हृदयास पोषक अशी सांगितलेली आहे अर्जुनारिष्ट हे हृदयावरील महत्त्वाचे औषध आहे. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
advertisement
2/21
डाळिंब : गणपतीच्या आवडत्या फळांपैकी डाळिंब एक फळ आहे. दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी, डाळिंबाचे मूळमु कृमिघ्न आहे; उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमध्ये डाळिंब उपयुक्त आहे
advertisement
3/21
तुळशीची पाने (Ocimum Sanctum): तुळशीचा स्वरस म्हणजेच पानांचा रस हा सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. त्वचारोगांवर देखील तुळशीचा छान उपयोग शास्त्रात सांगितलेला आहे. गजकर्ण या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.
advertisement
4/21
अगस्ती(हादगा) : अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). जीवनसत्त्व 'अ' हे दृष्टीला पोषक आहे. बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये आहे . प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. हादग्याच्या फुलांची भाजी देखील पौष्टिक आहे.
advertisement
5/21
आघाडा : अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.आघाडा कफनाशक आणि विष दूर करण्यासाठीही विशेष उपयोगी आहे. स्त्रीरुपी गौरी या आघाडा वनस्पतीच्या बसवल्या जातात.
advertisement
6/21
दूर्वा (Cynodon Dectylon) गवता पैकी एक. गणपती हे (उष्ण) तत्त्वप्रधान देवआहे आणि उष्णतेचे दाह शमन करणारी एक वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक महत्त्वाचे औषध आहे.
advertisement
7/21
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum) योग्य मात्रेत वापरल्यास औषधासारखे काम करते. परंतु हे विषारी असल्यामुळे कनेर हे जपून वापरावे
advertisement
8/21
शमी : शमीची पाने (Prosopis Spicigera) : 'शमयति रोगान् इति' म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी. रोग शमन ,दाह शमन, व्रणशमन यांसाठी शमीची पाने वापरली जातात.
advertisement
9/21
मंदार (Calotropis procera.) : मंदार उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध कार्य सुधारणारे आणि शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे. अस्थमा मुळव्याध यांवर गुणकारी आहे.
advertisement
10/21
विष्णूक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आकलन शक्ती वाढवण्यासाठी शंखपुष्पी चा उपयोग आयुर्वेदात सांगितलेला आहे.
advertisement
11/21
धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील प्रभावी औषध आहे. धोतरा विषारी असल्यामुळे तो योग्य मात्रेतच प्राशन करावा अन्यथा शरीरास त्रास होऊ शकतो.
advertisement
12/21
मरुपत्र (Origanum Margorana). मरवा अतिशय सुगंधी असतो. हार्मोनच्या नैसर्गिक संतुलनासाठी सुगंधाचा उपयोग छान प्रकारे होतो. आणि तेच मरू पत्र काम करते. पियुषिका ग्रंथीला उत्तेजण मिळण्यासाठी मरूपत्राचा उपयोग होतो.
advertisement
13/21
मधुमालती म्हणजे मालती (शास्त्रीय नाव - Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने विविध मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.अनेक रुग्ण जे मुख रोगांनी ग्रासलेले आहेत, त्या औषधांमध्ये मधुमालतीचा प्रामुख्याने समावेश असतो.
advertisement
14/21
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास अतिरिक्त भूक सतत खात राहण्याची इच्छा हा आजार कमी होतो लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
advertisement
15/21
बेलाची पाने (Aegle Marmelos.) बेल ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवर उत्तम औषध आहे. बेलाच अवलेह पचन उत्तम ठेवण्यास मदत करते.
advertisement
16/21
पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ या वृक्षाचा उल्लेख ऋग्वेद मध्ये सापडतो. मूत्र रोगांवर्ती पिंपळाचा उपयोग शास्त्रामध्ये आढळून येतो. पिंपळासारखा वर्षानुवर्ष जगणाऱ्या वृक्षाची लागवड यानिमित्ताने करणे आवश्यक आहे
advertisement
17/21
देवदार चा उपयोग स्त्री यांवरील विविध रोगामध्ये केला जातो. जीवाणूनाशक, वेदनशामक, दाहक-विरोधी, Antioxidant, अल्सर-विरोधी, पाचक, कफ पाडणारे औषध
advertisement
18/21
जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.
advertisement
19/21
डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीच्या पानांमुळे दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.दात मजबूत होतात त्यामुळे अन्न चावण्याची प्रक्रिया चांगली होऊन चयापचय चांगले होते.
advertisement
20/21
केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.
advertisement
21/21
माका : भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) केसांसाठी वरदान म्हणजे मका आहे माक्याच्या पानांचा रस केसांच्या वाढीच्या उत्पादनांमध्ये वापरला जातो आणि त्यामुळेच केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो. माक्याची पंचांगं औषधी! कावीळ, मूळव्याध अशा अनेक विकारांवर माका उपयोगी!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ganesh Chaturthi : गणेशपूजना दरम्यान वाहिली जातात 21 प्रकारची पानं, जाणून घ्या त्यांचं महत्व!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल