Yoga Mistakes : योग करताना टाळा 'या' चुका, नाहीतर शरीरावर होतील गंभीर परिणाम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. जातो. दररोज योग केल्याने माणसाला केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्य सुद्धा लाभते. मात्र काहीजण योग करताना अनेक चुका करतात. या चुकांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
1/5

योग केल्याने शरीर गतिशील बनते, लवचिक होते तसेच मानसिक दृष्ट्या सुद्धा निरोगी राहते. परंतु व्यायाम सुरु करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा चुकीच्या पद्धतीने व्यायाम किंवा योग केल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. तेव्हा योगासन करताना कोणत्या चुका टाळाव्यात याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
2/5
प्रत्येक योग प्रकार करण्याची एक विशिष्ट वेळ असते. काही योग प्रकार केवळ 5 मिनिटे काही 10 मिनिटांकरताच करायचे असतात. तसेच योग सत्र हे 1 तासापेक्षा पेक्षा अधिकवेळ करता येत नाही. तेव्हा उर्वरित 23 तास तुमची जीवनशैली कशी असते. तुमची कोणता आहार घेता, योग्य वेळ विश्रांती घेता का हे सुद्धा महत्वाचे आहे.
advertisement
3/5
अनेकदा योग करण्याच्या उत्साहात काहीजण आपल्या शरीराच्या प्रकारानुसार योगासनांची निवड करण्यात गल्लत करतात. तुमच्या शरीराचा प्रकार आरोग्याची स्थिती, वय आणि शारीरिक क्षमता हे सर्व घटक योगाच्या परिणामांवर परिणाम करतात. त्यामुळे योगासन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तसेच तुमच्या शरीराच्या प्रकारानुसार योगासन करा.
advertisement
4/5
तुम्ही करत असलेले प्रत्येक योगासन, क्रिया आणि प्राणायाम यांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे वेळोवेळी आपल्या व्यायाम प्रकार, योगासन यात बदल करणे महत्वाचे आहे. दिनचर्या बदललयास थकवा कमी होण्यास मदत मिळू शकते. शरीराला नवीन ऊर्जा मिळते. तेव्हा सहा आठवडे योग दिनचर्या टिकवून ठेवा आणि त्याचे पालन करा यामुळे शरीराला फायदा होतो.
advertisement
5/5
काहीजण उत्साहाच्या भरात आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करतात. शारीरिक व्यायाम करताना समतोल राखला पाहिजे. नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ योगासन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. स्नायू दुखणे, ऊर्जा कमी होणे, बिनिंग इत्यादी ओव्हर ट्रेनिंगची लक्षण आहेत जी तुम्ही जास्तकाळ व्यायाम किंवा योग्य केल्यावर दिसायला लागतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Yoga Mistakes : योग करताना टाळा 'या' चुका, नाहीतर शरीरावर होतील गंभीर परिणाम