TRENDING:

Fennel Seeds : जेवल्यानंतर बडीशेप खाताय? मग 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायल्याच हव्यात

Last Updated:
बहुतांश भारतीय घरांमध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये जेवणानंतर बडीशेप दिली जाते. काहींना हा प्रकार इतका आवडतो, की ते दिवसभरात अनेकदा बडीशेप खातात. जेवणानंतर बडीशेप खाण्यामागे वैद्यकीय कारणं आहेत. आपल्या देशात जेवणानंतर बडीशेप खाण्याची प्रथा फार जुनी आहे. बडीशेपेमुळे तोंडाची चव तर वाढतेच, पण आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. बडीशेपेमुळे पोटाच्या समस्या कमी होतात, श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि पचन सुधारण्यास मदत होते. बडीशेपेचे जसे फायदे आहेत, तसेच तिचे काही तोटेदेखील आहेत. बडीशेप खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती घेऊ या. 
advertisement
1/9
जेवल्यानंतर बडीशेप खाताय? मग या गोष्टी तुम्हाला माहित असायल्याच हव्यात
बडीशेपेचे फायदे : पचनक्रियेत सुधारणा : बडीशेपेमध्ये ऍनेथॉल, फायबर, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात. ऍनेथॉल पोटातले एंझाइम्स सक्रिय करते आणि त्यामुळे अन्न लवकर पचतं. फायबर्स पचनास मदत करतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. बडीशेपेमुळे गॅस, अपचनासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
advertisement
2/9
बडीशेपेचे फायदे :  श्वासाची दुर्गंधी दूर होते : बडीशेप हा नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून उपयुक्त आहे. बडीशेप खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि फ्रेशनेस वाढतो.
advertisement
3/9
बडीशेपेचे फायदे :  वजन कमी करण्यास उपयुक्त : बडीशेपमुळे मेटॅबॉलिझम वाढण्यास मदत होते. परिणामी वजन कमी करण्यासदेखील मदत होते. शरीरातले विषारी घटक काढून टाकण्यासदेखील बडीशेप उपयुक्त आहे.
advertisement
4/9
बडीशेपेचे फायदे :  अँटिऑक्सिडंट गुण : बडीशेपेमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक शरीरातल्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
advertisement
5/9
बडीशेपेचे फायदे :  ब्लड प्रेशर नियंत्रण : बडीशेपेमध्ये पोटॅशियम असतं. हा घटक ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. परिणामी, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
6/9
बडीशेपेचे तोटे :  अ‍ॅलर्जी : काही जणांना बडीशेपेची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यामुळे खाज सुटणं, सूज येणं आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. बडीशेपेची अ‍ॅलर्जी असेल तर बडीशेप खाऊ नये.
advertisement
7/9
बडीशेपेचे तोटे :  हॉर्मोनल परिणाम : बडीशेपेमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स असतात. त्यामुळे हॉर्मोनल संतुलनावर परिणाम होतो. बडीशेपच्या अतिसेवनाने हॉर्मोनशी संबंधित समस्या वाढू शकतात.
advertisement
8/9
बडीशेपेचे तोटे :  डायबेटिक रुग्णांसाठी घातक : बडीशेपेमध्ये साखर असते. डायबेटिक रुग्णांसाठी बडीशेप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे मर्यादित प्रमाणातच बडीशेप खावी.
advertisement
9/9
बडीशेपेचे तोटे :  पोटाच्या समस्या : जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब आणि उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणातच बडीशेप खावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fennel Seeds : जेवल्यानंतर बडीशेप खाताय? मग 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायल्याच हव्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल