Reading Nook : फक्त एक हजारात तयार होईल कोझी आणि सुंदर रिडींग कॉर्नर! फॉलो करा या टिप्स
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Creating Cozy Reading Nook In Small Spaces : तुमच्या घरात एखादी अशी जागा आहे का, जी तुम्ही वापरत नाही? एक अशी जागा जिथे तुम्ही शांतपणे बसून, एखादं पुस्तक वाचू शकता किंवा फक्त आराम करू शकता? जर असेल, तर तुम्ही थोडी कल्पनाशक्ती आणि काही सोप्या गोष्टींचा वापर करून तुमच्या घरात एक शांत आणि आरामदायक कोपरा बनवू शकता आणि ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवू शकता.
advertisement
1/7

अनेकदा आपल्याला वाटते की, घरात एक शांत आणि आरामदायक जागा तयार करण्यासाठी खूप मोठी जागा किंवा जास्त खर्च लागतो. पण हे खरे नाही. लहान जागेतही तुम्ही तुमच्यासाठी एक आरामदायक वाचन कोपरा तयार करू शकता तेही फक्त 1,000 रुपयांच्या आत.
advertisement
2/7
मऊ गालिचा/मॅट : 300 ते 400 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही एक चांगला गालिचा घेऊ शकता. सगळ्यात आधी जमिनीवर हा मऊ गालिचा किंवा मॅट अंथरा. यामुळे गेच त्या जागेला एक खास स्वरूप येईल आणि ती जागा आरामदायी वाटेल.
advertisement
3/7
कुशन आणि थ्रो : 300 ते 350 रूपांमध्ये मिळणारे कुशन आणि थ्रो जागेला अधिक आरामदायी बनवतील. यासाठी मोठे आणि मऊ कुशन ठेवा. तुम्ही एक मऊ थ्रो किंवा पातळ ब्लँकेट देखील वापरू शकता, ज्यामुळे ती जागा अधिक आरामदायक वाटेल.
advertisement
4/7
फेयरी लाईट्स आणि मूड लाईटिंग : हे तुम्हाला 150 ते 200 रुपयांमध्येही मिळतील. उबदार प्रकाश कोणत्याही जागेला आरामदायक बनवतो. फेयरी लाईट्स किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मंद दिव्यांमुळे जागेचे स्वरूप लगेच बदलेल आणि एक जादुई वातावरण तयार होईल.
advertisement
5/7
छोटे अतिरिक्त साहित्य : तुम्ही 100 ते 150 रुपयांमध्ये काही छोट्या छोट्या वस्तू घेऊ शकता. तुमच्या आवडीच्या गोष्टी वापरून त्या जागेला खास बनवा. तुमची आवडती पुस्तके, मेणबत्ती, कॉफी मग यांसारख्या गोष्टी तुम्ही DIY शेल्फवर ठेवू शकता.
advertisement
6/7
कोझी ट्रान्सफॉर्मेशन : 1,000 रुपयांपेक्षाही कमी खर्चात तुम्ही एक शांत जागा तयार करू शकता. ही जागा वाचन करण्यासाठी, डायरी लिहिण्यासाठी किंवा दिवसभराच्या थकव्यानंतर कॉफी पिण्यासाठी योग्य आहे.
advertisement
7/7
तुमच्याकडे आधीच असलेल्या गोष्टींचा वापर करा. एखादी जुनी ओढणी तुम्ही थ्रो म्हणून वापरू शकता, स्टीलच्या ग्लासचा वापर छोटे रोपटे लावण्यासाठी करू शकता, किंवा जुनी चादर कापून एक मॅट बनवू शकता. आरामदायक होण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Reading Nook : फक्त एक हजारात तयार होईल कोझी आणि सुंदर रिडींग कॉर्नर! फॉलो करा या टिप्स