4 असे पदार्थ जे चुकूनही शिजवू नये कुकरमध्ये! चव, पौष्टिक तत्त्व निघून जातील पूर्ण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Cooking Tips: जेवण लवकर बनून तयार व्हावं यासाठी आपण प्रेशर कूकरचा वापर करतो. कूकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजतात आणि गॅसही कमी लागतो. मात्र काही पदार्थ असे असतात की, जे कूकरमध्ये शिजवल्यास त्यांची मूळ चव निघून जाते.
advertisement
1/5

आपल्या भारतात जवळपास प्रत्येक घरात कूकर असतोच. त्यात लवकर आणि स्वादिष्ट जेवण बनून तयार होतं. परंतु प्रत्येक पदार्थ बनवण्यासाठी कुकर वापरायलाच हवा असं काही नाही. काही पदार्थ असेही असतात जे कुकरमध्ये कधीच शिजवू नये.
advertisement
2/5
पालेभाज्या शिजवण्यासाठी बऱ्याचदा कुकरचा वापर केला जातो. परंतु पालेभाज्या कुकरमध्ये विरघळतात. त्यात पौष्टिक तत्त्वही नष्ट होतात. अशा भाज्यांमधून आपल्या आरोग्याला काहीच फायदे मिळत नाहीत.
advertisement
3/5
दूध, क्रीम आणि पनीरपासून तयार होणाऱ्या पदार्थांसाठीही कुकरचा वापर करू नये. जास्त तापमान आणि प्रेशरमध्ये शिजल्यामुळे या पदार्थांची गुणवत्ता ढासळू शकते. त्यांची चव बिघडू शकते.
advertisement
4/5
पास्ता, नूडल्स असे फास्ट फूडही कधीच कुकरमध्ये शिजवू नये. कुकरमध्ये पदार्थ लवकर शिजतात हे खरंय, परंतु ते चिकट होतात. ज्यामुळे त्यांची चव निघून जाते.
advertisement
5/5
पदार्थ तळण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी कधीच कुकरचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ क्रंची होणार नाहीतच, परंतु चिकट आणि गिळगिळीत होऊ शकतात, शिवाय त्यांची चवही जाऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
4 असे पदार्थ जे चुकूनही शिजवू नये कुकरमध्ये! चव, पौष्टिक तत्त्व निघून जातील पूर्ण