ना स्टील, ना नॉनस्टिक! तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या भांड्यातलं जेवण सर्वात पौष्टिक
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
फ्रिजमधलं थंडगार पाणी प्यायलं की जीवाला हायसं वाटतं. मात्र माठातलं पाणी आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं, असं तज्ज्ञ सांगतात. त्याप्रमाणेच कोणत्या भांड्यात बनवलेलं जेवण जास्त पौष्टिक असतं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? पडला असेल, तर त्याचं आज उत्तर जाणून घेऊया. (अर्पित कुमार बडकूल, प्रतिनिधी)
advertisement
1/5

अनेकजण स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण बनवतात, काहीजण लोखंडी कढई वापरतात, तर काहीजण नॉनस्टिक भांडी वापरतात. खरंतर मातीची भांडी आतून शीत आणि पूर्णपणे नैसर्गिक असतात. त्यामुळे अर्थातच त्यात शिजणारं जेवण हे आरोग्यासाठी पौष्टिक असतं, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
2/5
आयुर्वेदिक डॉक्टर अनुराग अहिरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मातीच्या भांड्यांमध्ये तयार होणाऱ्या जेवणात एक नैसर्गिक गोडवा असतो. विशेषतः टोमॅटोसारख्या ऍसिडिक पदार्थांमध्ये मातीचा गोडवा समाविष्ट झाल्यास त्यांचं पचन व्यवस्थित होतं.
advertisement
3/5
मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यास त्याला जास्त वाफ मिळते, त्यातून पाणी निर्माण होतं. त्यामुळे बाहेरून जास्त पाणी किंवा तेल घालण्याची आवश्यकता नसते. परिणामी <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/dragon-fruits-unknowing-health-secrets-it-helps-in-weight-loss-mnkj-mhij-1219135.html">पौष्टिक</a> अन्नपदार्थ तयार होतात.
advertisement
4/5
मातीच्या भांड्यांमध्ये नॉनस्टिक गुणधर्म असतात. यात शिजवलेले अन्नपदार्थ फॅट फ्री असू शकतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/food/oil-or-ghee-what-is-healthier-choice-l18w-mhij-1219623.html">फायदेशीर</a> ठरू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/bhakri-or-chapati-for-weight-loss-mnkj-mhij-1219615.html">आहाराबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
ना स्टील, ना नॉनस्टिक! तज्ज्ञांनी सांगितलं कोणत्या भांड्यातलं जेवण सर्वात पौष्टिक