Kohla Juice Benefits : अमृतापेक्षा कमी नाही 'या' सफेद भाजीचा ज्यूस, शरीरातील 5 आजारांना करतो दूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
निसर्गात अशा काही भाज्या, फळे आहेत ज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्याने शरीरातील अनेक आजार समस्या दूर होऊ शकतात. यापैकीच एक भाजी म्हणजे कोहळा. कोहळ्याला प्रथिने, लोह, जस्त, कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले स्रोत मानले जाते. बरेचजण याला पांढरा भोपळा म्हणून देखील ओळखतात. याच कोवळ्याचा ज्यूस दररोज सकाळी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होऊ शकतात.
advertisement
1/5

पांढऱ्या भोपळ्यामध्ये भरपूर कॅलरीज, फायबर आणि पाणी असते. त्यामुळे याचा रस प्यायल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूकही लागत नाही. जर तुमचे पोट वाढले असेल तर तुमच्या आहारात पांढर्या भोपळ्याच्या रसाचा अवश्य समावेश करा याने सुटलेले पोट कमी होऊ शकते.
advertisement
2/5
पांढऱ्या भोपळ्यामध्ये असे पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात की ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ काढून टाकतात आणि रक्त शुद्ध करतात. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते.
advertisement
3/5
पांढऱ्या भोपळ्याच्या रसामध्ये झिंक, फॉस्फरस, थायमिन, रिबोफ्लेविन यासह अनेक अँटिऑक्सिडंट आढळतात जे थकवा, आळस दूर करतात आणि शरीरात ऊर्जा आणतात. झटपट एनर्जी मिळवण्यासाठी आणि दिवसभर उत्साही राहण्यासाठी रोज सकाळी पांढऱ्या भोपळ्याचा रस प्यायल्यास फायदा होऊ शकेल.
advertisement
4/5
पांढऱ्या भोपळ्याच्या रसामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, भोपळ्याचा रस रोज प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी यांसारखे आजार बरे होतात.
advertisement
5/5
पांढऱ्या भोपळ्यामध्ये फायटोस्टेरॉल नावाचे कंपाउंड आढळते. यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तसेच याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी झाल्याने हृदयविकाराचा धोका येण्याचे प्रमाण कमी होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kohla Juice Benefits : अमृतापेक्षा कमी नाही 'या' सफेद भाजीचा ज्यूस, शरीरातील 5 आजारांना करतो दूर