थंडीत अंडी खाणं औषधापेक्षा भारी, फायदे वाचाल तर संडे मंडे नाही, आठवडाभर खाल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Egg benefits for health: अंड सुपरफूड मानलं जातं. यात व्हिटॅमिन्ससह अनेक पोषक तत्त्व भरभरून असतात. तसंच अंडी व्हिटॅमिन डीने परिपूर्ण असतात. अंड्यांमधून शरीराला नेमके काय फायदे मिळतात, जाणून घेऊया. (अरविंद कुमार दुबे, प्रतिनिधी / सोनभद्र)
advertisement
1/5

थंडीत साथीचे आजार वेगानं पसरतात. अशात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठी शरीर आतून उबदार असायला हवं. अंडी गरम असतात, त्यामुळे थंडीत अंड्यांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
advertisement
2/5
हिवाळ्यात अंडी औषधांपेक्षा काही कमी मानली जात नाहीत. जाणकार सांगतात की, हिवाळ्यात दररोज अंडी खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून निघते.
advertisement
3/5
मध्यम आकाराच्या एका अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असतं. त्याचा उपयोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होतो. अंड्यांमुळे हाडंदेखील भक्कम होतात. एकूणच, अंडी शरीराला ताकदवान बनवतात.
advertisement
4/5
डॉक्टर प्रमोद चौबे यांनी सांगितलं की, अंडी गरम असतात त्यामुळे ती अति खाऊ नये. जर तुम्हाला हृदयासंबंधी काही आजार असेल तर अंडी खाण्यामुळे त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे अंड्यांचं सेवन प्रमाणात करावं. जास्त अंडी खाल्ल्यास दुखणं वाढू शकतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीत अंडी खाणं औषधापेक्षा भारी, फायदे वाचाल तर संडे मंडे नाही, आठवडाभर खाल!