जरा पाऊस पडला की पोटात होतं गुडगुड? हसण्यावारी घेऊ नका, झटपट उपाय करा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिरातील विविध आजारांची सुरूवात पोटापासून होते. त्यामुळे निरोगी राहायचं असेल तर पोट सुदृढ असणं आवश्यक आहे. यासाठी आज आपण घरगुती रामबाण उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे पोट निरोगी राहीलच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत मिळेल.
advertisement
1/5

आल्यामध्ये पोटासाठी उपयुक्त असे अनेक गुणधर्म असतात, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. शिवाय टाकाऊ पदार्थ सहज शरिराबाहेर पडतात. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आलं ठेचून ग्लासभर पाण्यात उकळवून हे कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
2/5
कडूलिंब जेवढं कडू तेवढं शरिरासाठी फायदेशीर. यामुळे केवळ पोट नाही, तर <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/benefits-of-banana-peel-for-healthy-skin-mhij-1215587.html">त्वचासुद्धा निरोगी राहते</a>. विशेषतः ऍसिडिटीवर आराम मिळवण्यासाठी सकाळी कडूलिंबाची पानं घालून उकळलेलं पाणी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ऍसिडिटी आणि पोटदुखी दोन्ही दूर होते.
advertisement
3/5
जिरं जवळपास प्रत्येक किचनमध्ये वापरलं जातं. जे पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतं. यात भरपूर आयर्न, कॉपर, कॅल्शियम आणि पोटॅशियमसह विविध अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरिरावरील सूज कमी होते आणि अन्नपचन व्यवस्थित होतं.
advertisement
4/5
तुळशीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा काढा किंवा चहा <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/is-pomegranate-safe-for-diabetics-mhij-1216146.html">आरोग्यासाठी फायदेशीर</a> ठरतो. यात अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील आतड्या भक्कम राहतात.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/this-fruit-is-amazing-and-its-leaves-are-panaceas-for-many-diseases-l18w-mhij-1216238.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
जरा पाऊस पडला की पोटात होतं गुडगुड? हसण्यावारी घेऊ नका, झटपट उपाय करा!