TRENDING:

जरा मोबाईल वापरला की, डोकं दुखतं, डोळे लाल होतात? याकडे दुर्लक्ष करू नका!

Last Updated:
अनहेल्थी डायट आणि मोबाईल, लॅपटॉपच्या अतिवापरामुळे हा त्रास होऊ शकतो. तो टाळण्यासाठी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी आणि आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवे.
advertisement
1/5
जरा मोबाईल वापरला की, डोकं दुखतं, डोळे लाल होतात? याकडे दुर्लक्ष करू नका
वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणं सामान्य आहे. परंतु वय जसं वाढतं, तसा चष्म्याचा नंबर वाढत असेल, तर मात्र ही चिंतेची बाब आहे. कारण यामुळे आपल्याला ग्लूकोमाशी संबंधित आजार असू शकतो.
advertisement
2/5
वेळच्या वेळी तपासणी केल्यास आपल्या डोळ्यांचं आरोग्य कसं आहे हे अचूक कळेल आणि काही त्रास असेल तर त्यावर उपचार करता येतील.
advertisement
3/5
डॉक्टर अरविंद चौहान सांगतात की, डोळ्यांची दृष्टी जाण्याचं सर्वात मोठं कारण असतं ग्लूकोमा. केंद्र सरकारकडून याबाबत एक मोहिमही सुरू आहे. त्याद्वारे लोकांना ग्लूकोमाबाबत जागरूक केलं जातंय.
advertisement
4/5
ऑप्टिक नर्व्ह आपल्या रेटिनाला मेंदूशी जोडतात. या नसा कमकुवत झाल्यास मेंदूला संकेत मिळणं कमी होतं आणि दृष्टी कमकुवत होऊ लागते. हा आजार वाढत गेला की मग पुन्हा दृष्टी मिळवणं अवघड होतं. कारण नर्व्हमुळेच समोर दिसणारी दृश्य मेंदूपर्यंत पोहोचवली जातात आणि ती आपल्याला स्पष्ट दिसतात.
advertisement
5/5
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण वेळच्या वेळी जेवत नाही, बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खातो. शिवाय जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर असतो. त्यामुळे ग्लूकोमाचा त्रास होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
जरा मोबाईल वापरला की, डोकं दुखतं, डोळे लाल होतात? याकडे दुर्लक्ष करू नका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल