सतत अशक्तपणा जाणवतो, अंग दुखतं? 'ही' 4 फळं भरून काढतील Vitamin B12ची कमी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिरात सतत अशक्तपणा असेल, अंगदुखी असह्य होत असेल, विनाकारण अस्वस्थ वाटत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण याचा भविष्यात गंभीर त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान, या वेदनांचं कारण शरिरातली व्हिटॅमिन बी12ची कमतरता असू शकते. त्यामुळे ती कशी भरून काढायची पाहूया. (पिया बॅनर्जी, प्रतिनिधी)
advertisement
1/7

व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे ऍनेमिया होऊ शकतो. म्हणजेच रक्तातल्या लाल पेशींची संख्या कमी होणं. शिवाय अशक्तपणा येणं आणि हात-पाय सुन्न पडण्यासह मानसिक आरोग्यही बिघडू शकतं.
advertisement
2/7
डॉक्टर विश्वजीत सरकार सांगतात की, आहारात फळांचा समावेश आवर्जून करावा. फळांमुळे व्हिटॅमिन्सची कमतरता भरून निघू शकते.
advertisement
3/7
आंबा हे उन्हाळी फळांमधलं प्रमुख फळ. जे चवीला स्वादिष्ट लागतंच, शिवाय फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी12ने परिपूर्ण असतं. त्यामुळे या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आंबे खाऊच शकता.
advertisement
4/7
सफरचंदात व्हिटॅमिन बी12 भरपूर असतं. रोजच्या आहाराच्या सफरचंदाचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
5/7
केळ्यांमध्येसुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी12 असतं. खरंतर केळी सर्व वयोगटातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
6/7
किवी फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात असतं . व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेवर उपचार म्हणून किवी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-cook-dal-and-pulse-icmr-give-guidelines-which-optimising-the-nutritional-benefits-mhpp-1194279.html">आहारा</a>बाबत, <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/ac-can-be-harmful-for-diabetes-patients-there-is-a-risk-of-brain-stroke-mhij-1194256.html">आरोग्या</a>बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/how-to-choose-and-use-sunscreen-avoid-common-mistakes-mhij-1194143.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
सतत अशक्तपणा जाणवतो, अंग दुखतं? 'ही' 4 फळं भरून काढतील Vitamin B12ची कमी