TRENDING:

फळ भारीच, पण पानं औषधी! त्वचेपासून पोटापर्यंत फायदे असंख्य

Last Updated:
लहानपणापासून आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. पपई गरम असते, तरी तिचे आरोग्याला अनेक फायदे होतात. विशेषतः पपईची पानं आरोग्यदायी असतात. (हिना आझमी, प्रतिनिधी)
advertisement
1/6
फळ भारीच, पण पानं औषधी! त्वचेपासून पोटापर्यंत फायदे असंख्य
आयुर्वेदात पपईच्या पानांना प्रचंड महत्त्व आहे. डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांमध्ये ही पानं उपयुक्त मानली जातात. डेंग्यू, मलेरिया झाल्यास शरिरातल्या पेशी कमी होतात, अशावेळी पपईच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो. शिवाय अन्नपचन आणि नितळ त्वचेसाठीसुद्धा ही पानं उपयुक्त असतात.
advertisement
2/6
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनमधील आयुर्वेदिक डॉक्टर सिराज सिद्दीकी यांनी सांगितलं की, पपईच्या पानांचा विविध औषधांमध्ये वापर होतो.
advertisement
3/6
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी पपईची पानं फायदेशीर ठरतात. <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/add-these-five-ingredients-to-coconut-oil-it-can-save-your-hair-mhij-1214969.html">घनदाट केसांसाठी</a> हेअर मास्क म्हणून या पानांचा वापर केला जातो.
advertisement
4/6
केसांमध्ये पपईच्या पानांची पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. शिवाय अनेकजण पपईची ताजी पानं चावून खातात. यामुळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/benefits-of-banana-peel-for-healthy-skin-mhij-1215587.html">त्वचारोग दूर होण्यास मदत</a> मिळते.
advertisement
5/6
पपईच्या पानांमुळे अन्नपचनही सुरळीत होतं. शिवाय गॅस, उलटी, बद्धकोष्ठता, मळमळ हा त्रास दूर होतो.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/how-to-protect-yourself-and-family-from-dengue-mhij-1215397.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
फळ भारीच, पण पानं औषधी! त्वचेपासून पोटापर्यंत फायदे असंख्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल