ढेकणांवर उपाय! एकदा करूनच बघा, समूळ नायनाट होईल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घरात साध्या मुंग्या जरी दिसल्या तरी आपल्याला टेन्शन येतं की, आता घरभर मुंग्या तर होणार नाहीत ना. आपण मुंग्या, झुरळ, पाल शक्य तितकं घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यात जर घरात एकदा ढेकूण झाले, तर काही विचारायलाच नको. 10 ढेकणांचे कधी 100 ढेकूण होतात आपल्यालाही कळत नाही. मात्र घाबरू नका ढेकणांवर उपाय आहे.
advertisement
1/5

ढेकूण शक्यतो अंधाऱ्या जागी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ते बिछान्यात आढळतात. ते एवढे सुईसारखे सतत चावतात की, आपली झोप उडते. जाणकार सांगतात, ढेकूण असो किंवा कोणतेही किटक असो कडूलिंब, बेकिंग सोडा, पुदिना आणि लवंग त्यांना दूर करू शकते. आपल्याला केवळ उपाय कसे करायचे हे माहित असायला हवं.
advertisement
2/5
बेकिंग सोडा हा किटकांवर रामबाण उपाय आहे. हा सोडा बिछान्यावर हलका हलका पसरवावा. यामुळे काही दिवसांतच किटाणू नष्ट झाल्याचं पाहायला मिळू शकतं.
advertisement
3/5
पुदिन्याची पानं कुस्करून बेडवर पसरवावी, कपाटात ठेवल्यासही झुरळांपासून सुटका मिळू शकते. आपण लवंगणाच्या तेलाचे काही थेंब गादीवर शिंपडल्यासमुळेसुद्धा किटाणू हळूहळू कमी होऊ शकतात.
advertisement
4/5
कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात. ही पानं पाण्यात उकळून, हे पाणी किटाणू असलेल्या जागी शिंपडावं. यामुळे चटईत किंवा बेडखाली झालेले ढेकूणही कमी होऊ शकतात.
advertisement
5/5
लक्षात घ्या, घरात किटाणू होऊ नये यासाठी <a href="https://news18marathi.com/lifestyle/are-you-suffering-from-insects-in-the-house-during-monsoon-escape-the-lava-using-this-trick-mhsz-1228318.html">स्वच्छता राखणं अत्यंत आवश्यक</a> आहे. घरात <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/tips-and-tricks-dry-wet-socks-in-15-minutes-just-use-these-simple-tips-mhsz-1229744.html">पुरेसा सूर्यप्रकाश</a> यायला हवा, कारण <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/do-not-eat-panipuri-in-rainy-season-even-by-mistake-l18w-mhij-local18-1230497.html">दमट वातावरणात विषाणू उत्पत्ती</a> होऊ शकते. शिवाय अशा वातावरणात विषाणू जास्त काळ टिकून राहतात.