TRENDING:

Mango Peels Uses : आंब्याच्या साली फेकून देता? या 5 प्रकारे वापराल तर होतील जबरदस्त फायदे..

Last Updated:
उन्हाळ्यात लोक आवडीने आंबे खातात. आंबे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात, फक्त ते मर्यादित प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे. लोक आंबे तर खातात. मात्र त्याच्या साली फेकून देतात. आंब्यांच्या सालीचा कसा आणि किती उपयोग होऊ शकतो, हे बहुतांशी लोकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला आंब्यांच्या सालीचे भन्नाट उपयोग सांगणार आहोत.
advertisement
1/8
आंब्याच्या साली फेकून देता? या 5 प्रकारे वापराल तर होतील जबरदस्त फायदे..
आंब्याला पोषणाचा पॉवर पॅक म्हणतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. साधारणपणे आंबा खाण्यासाठी आपण त्याची साल सोलून त्याचा लगदा खातो.
advertisement
2/8
आंब्याची साल बहुतेक घरांमध्ये डस्टबिनमध्ये टाकली जाते. पण आंब्यांची साल कळूप जास्त फायदेशीर असते, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-store-mango-for-months-to-eat-even-after-the-season-is-over-mhpj-1187806.html">आंब्याची साल</a> कशी वापरायची याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
3/8
कंपोस्ट तयार करा : जेव्हा तुम्ही आंबा खाता तेव्हा त्याची साल धुवून एका भांड्यात साठवा. आता ही साले मातीच्या भांड्यात ठेवा आणि त्यात वापरलेली चहाची पत्तीही घाला. ते मातीने भरा आणि काही दिवसात ते खत म्हणून तयार होईल.
advertisement
4/8
मँगो टी बनवा : मँगो टीचे नाव तुम्ही ऐकले असेलच. हे बनवण्यासाठी तुम्ही आंब्याची साल वापरू शकता. आंब्याची साल पाण्यात उकळा आणि चहा पत्तीसोबत चांगले उकळा. आता ते गाळून प्या. यामध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात.
advertisement
5/8
त्वचेवर वापरा : जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असतील तर तुम्ही आंब्याच्या सालीच्या मदतीने त्या दूर करू शकता. आंब्याची साल स्वच्छ धुवून वाळवा, बारीक करून साठवा. त्यात पाणी किंवा दही मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेत घट्टपणा येतो. तसेच टॅनिंगदेखील दूर होते.
advertisement
6/8
भाजीची चव वाढवते : तुम्ही <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-pickle-benefits-eat-homemade-mango-pickle-for-boosting-immunity-and-digestion-mhpj-1188667.html">आंब्याच्या</a> सालीपासूनही भाजी बनवू शकता. डीप फ्राय करून त्यात मसाले वगैरे घालून सर्व्ह करू शकता. त्याची कुरकुरीत भाजी खूप चविष्ट लागते.
advertisement
7/8
पचन सुधारते : जर तुम्हाला उन्हाळ्यात दररोज पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. यासाठी आंब्याच्या सालीचे चिप्स, चहा किंवा पावडर वापरू शकता.
advertisement
8/8
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mango Peels Uses : आंब्याच्या साली फेकून देता? या 5 प्रकारे वापराल तर होतील जबरदस्त फायदे..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल