TRENDING:

Skincare Tips : प्रत्येक सणाला तुम्हीच 'श्रावण क्वीन', 10 नैसर्गिक पदार्थ वापरा, मेकअप न करताही सुंदर दिसाल

Last Updated:
Skincare Natural Ingredients : नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेल्या त्वचा काळजीच्या दिनचर्येचा समावेश केल्यास तुमची त्वचा निरोगी, चमकदार बनते. हे नैसर्गिक घटक त्वचेसाठी अधिक सुरक्षित आणि परिणामकारक असतात. ते कोणते ते पाहुयात.
advertisement
1/11
प्रत्येक सणाला तुम्हीच 'श्रावण क्वीन', 10 नैसर्गिक घटक, मेकअपशिवाय सुंदर दिसाल
सध्या श्रावण सुरू आहे. श्रावण म्हणजे सणवार. आता नारळीपौर्णिमा, नंतर रक्षाबंधन, गणेशोत्सव असे बरेच सण आहेत. सण म्हटलं की महिलांचं नटणंथटणं आलंच आणि नटणंथटणं म्हणजे त्वचेची काळजीही आलीच. त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने क्लीन्सर, टोनर आणि मॉइश्चरायझर यांचा समावेश असतो. पण बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये केमिकल असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. याला पर्याय म्हणजे तुम्ही नैसर्गिक पदार्थ वापरू शकता.
advertisement
2/11
अ‍ॅलोवेरा :  अ‍ॅलोवेरा जेल त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. हे त्वचा थंड ठेवतं, जळजळ कमी करतं आणि मुरुमांपासून आराम देतं. अ‍ॅलोवेरा जेल नियमित लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते.
advertisement
3/11
काकडी : त्वचेला थंडावा देतं आणि सूज कमी करतं. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडीचे स्लाइस ठेवल्यास फायदेशीर ठरतं.
advertisement
4/11
मध : हे नैसर्गिक अँटीसेप्टिक असून त्वचेला हायड्रेट करतं आणि मुरुमं रोखण्यात मदत करतं. याचा फेसपॅक स्वरूपात वापर करता येतो.
advertisement
5/11
लिंबू : त्वचेसाठी नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. पण संवेदनशील त्वचेसाठी पाणी किंवा दह्याबरोबर वापरणं आवश्यक आहे. हे त्वचा उजळवतं आणि डाग दूर करतं.
advertisement
6/11
बेसन :  त्वचेवरील तेलकटपणा कमी करतं आणि त्वचा उजळवण्यास मदत करतं. बेसन, हळद आणि दुधाचा फेसपॅक करून लावल्यास मुरूम, काळी डाग आणि सुरकुत्यांपासून आराम मिळतो.
advertisement
7/11
बदाम तेल : हे एक हलकं तेल आहे जे व्हिटॅमिन ई युक्त आहे, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण प्रदान करतं. ते मुरुमांपासून बचाव करण्यास आणि डोळ्यांखालील सूज कमी करण्यास प्रभावीपणे मदत करते.
advertisement
8/11
सूर्यफूल तेल : जीवनसत्त्वे ई, ए, सी आणि डी ने समृद्ध असलेले तेल, त्वचेसाठी विविध प्रकारे फायदेशीर आहे. त्वचेच्या छिद्रांना मोकळे करून, मॉइश्चरायझ करून मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या टाळण्यास मदत करतं. त्यातील पोषक आणि अँटिऑक्सिडंट घटक सुरकुत्या कमी करण्यासदेखील मदत करतं.
advertisement
9/11
गुलाबजल : स्किनकेअरसाठी प्रसिद्ध असलेलं गुलाबजल केवळ त्वचा क्लिन करण्यासाठीच नाही तर ती हायड्रेट करण्यासाठी आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहे.
advertisement
10/11
नारळाचं तेल :  हे तेल सौम्य अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी युक्त आहे. त्वचेला पोषण देतं, कोरडेपणा दूर करतं, मॉइश्चरायझर म्हणून काम करतं.
advertisement
11/11
ऑलिव्ह ऑइल : यात व्हिटॅमिन ई असते, जो एक अँटिऑक्सिडेंट असतो जो त्वचेला पोषण देतो आणि तिचं एकूण आरोग्य वाढवतो. त्याची हलकी आणि चिकट नसलेली पोत ते एक उत्कृष्ट मॉइश्चरायझर बनवते, तसेच जळजळ आणि मुरुमांच्या उपचारांमध्ये देखील मदत करतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Skincare Tips : प्रत्येक सणाला तुम्हीच 'श्रावण क्वीन', 10 नैसर्गिक पदार्थ वापरा, मेकअप न करताही सुंदर दिसाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल