TRENDING:

Moringa Powder Benefits: केसांसाठी फायद्याची आहेत ‘ही’ हिरवी पानं; नियमीत वापराने ‘रॅपुन्झेल’ सारखे वाढतील केस

Last Updated:
Benefits of Moringa Powder in Marathi: शेवग्याचा पानांची पावडर ही मोरिंगा पावडर या नावाही ओळखली जाते. मोरिंगाच्या पानांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्वांमुळे ते केसांपासून ते हृदयाच्या विविध आजारांवर गुणकारी ठरते. जाणून घेऊयात शेवग्याच्या पानांच्या पावडरचे आरोग्यदायी फायदे.
advertisement
1/7
Moringa Powder Benefits: या' पानांच्या वापराने ‘रॅपुन्झेल’ सारखे मजबूत होतील केस
मोरिंगांच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉलेट, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात आढळून येतात. या सगळ्या पोषक तत्त्वांचा फायदा शरीराला आणि केसांना होतो.
advertisement
2/7
शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळून येतं. जे केसांच्या वाढीसाठी फायद्याचं आहे. व्हिटॅमिमुळे ए केस तजेलदार आणि मुलायम व्हायला मदत होते.
advertisement
3/7
शेवग्याच्या पानांमध्ये लोह म्हणजेच आयर्नसुद्धा आढळून येतं. शरीराच्या रक्त शुद्धिकरणासाठी शेवग्याची पानं फायद्याची आहेत. रक्तशुद्धीकरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा हा केसांना होतो. यामुळे केसांची मुळं मजबूत होऊन केसांना मजबुती येते.
advertisement
4/7
मोरिंगाच्या पानांमध्ये झिंकसुद्धा चांगल्या प्रमाणात आढळून येतं. यामुळे केसांची खुंटलेली वाढ पुन्हा जोमाने सुरू होते. झिंकमुळे केस तुटणं किंवा केस गळतीचा त्रास कमी होतो.
advertisement
5/7
शेवग्याच्या पानात अँटिऑक्सिडंट्स हे सुद्धा आढळून येतात. त्यामुळे शरीराचं मुक्त रॅडिकल्स पासून रक्षण होतंच. याशिवाय धुळ आणि प्रदूषणापासून केसांचं रक्षण करून त्यांना ताकद देण्याचं काम हे अँटिऑक्सिड्टंस करतात.
advertisement
6/7
शेवग्याच्या पानात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे खाज, कोंडा, उवा, लिंखाच्या समस्येवर शेवघ्याची पानं गुणकारी ठरू शकतात. शेवग्याच्या पानांचं तेल केसांना लावल्यास अनेक फायदे होतात.
advertisement
7/7
मोरिंगामध्ये असलेले ‘व्हिटॅमिन सी’ त्वचेला आणि केसांना अनेक फायदे पुरवतं. ‘व्हिटॅमिन सी’ मुळे केसांची लकाकी टिकून राहते आणि अकाली केस पांढरं होण्याचं प्रमाण कमी होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Moringa Powder Benefits: केसांसाठी फायद्याची आहेत ‘ही’ हिरवी पानं; नियमीत वापराने ‘रॅपुन्झेल’ सारखे वाढतील केस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल