TRENDING:

खिडकीत लावा 'हे' फूलझाड, Air Freshenerची गरज नाही पडणार!

Last Updated:
घराच्या कुंडीत, अंगणात विविध रोपांची लागवड करण्याची आवड अनेकजणांना असते. परंतु जर ही आवड जोपासायचीच असेल तर उपयुक्त रोपांची लागवड करावी. विशेषतः घराचं वातावरण सदैव प्रसन्न राहील अशी फुलझाडं लावली तर उत्तम. (भरत कुमार चौबे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
खिडकीत लावा 'हे' फूलझाड, Air Freshenerची गरज नाही पडणार!
पेटुनिया : उन्हाळ्यात लागवड केल्या जाणाऱ्या रोपांपैकी पेटुनिया हे एक महत्त्वाचं रोप आहे. ज्याची लागवड घराच्या कुंडीत सहजपणे केली जाऊ शकते. या रोपाला निळी, लाल, गुलाबी, नारंगी अशी विविधरंगी फुलं येतात. जी दिसायला अत्यंत सुंदर दिसतातच शिवाय त्यांचा सुगंधही अतिशय मनमोहक असतो.
advertisement
2/5
जिरेनियम : या फुलांचं रोप कुंडीत लावल्यास संपूर्ण घराची शोभा वाढते. इतकं ते सुंदर दिसतं. शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. या रोपाची सुरेख फुलं घराची शोभा वाढवण्यासह हवासुद्धा फ्रेश ठेवतात.
advertisement
3/5
बेगोनिया : या रोपाची फुलं लहानशी, नाजूक आणि अत्यंत देखणी असतात. त्यांचा रंग लाल, गुलाबी आणि पिवळसर असतो. सुगंध देण्यासह आरोग्य सुदृढ ठेवण्याचं कामही ते करतात. शिवाय श्वासासंबंधित आणि त्वचेसंबंधित आजारांवर हे रोप उपयुक्त असतं.
advertisement
4/5
झेंडू : कोणताही सणवार या फुलाशिवाय संपन्न होत नाही. झेंडूची फुलं दिसताच मूड अगदी फ्रेश होतो. या फुलांमुळे घराची शोभा वाढतेच शिवाय वातावरणात प्रसन्नताही निर्माण होते. तसंच डोळ्यांच्या, नाकाच्या आणि कानाच्या आरोग्यासाठीसुद्धा ही फुलं उत्तम असतात.
advertisement
5/5
गुलाब : गुलाब म्हणजे <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/these-5-photos-can-change-your-life-your-house-will-be-a-happy-place-l18w-mhij-1191294.html">प्रेमाचं प्रतीक</a>. त्यामुळे हे फूल जवळपास सर्वांनाच आवडतं. गुलाबाची विविधरंगी फुलं मिळतात. ही सर्व फुलं <a href="https://news18marathi.com/lifestyle/use-perfume-this-way-in-summer-fragrance-will-last-all-day-and-you-will-stay-fresh-mhpj-1190262.html">सुंदर</a> दिसतात आणि घराची शोभा वाढवतात. गुलाबाच्या पाकळ्यांच्या रसापासून तयार होणारं गुलाबपाणी आरोग्यासाठी अत्यंत <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/how-to-store-banana-to-keep-it-fresh-and-yellow-for-10-days-techniques-to-store-banana-mhpj-1191520.html">फायदेशीर</a> असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
खिडकीत लावा 'हे' फूलझाड, Air Freshenerची गरज नाही पडणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल