Vat Purnima : 'सातजन्मी तुझीच..', नववारी साडी, साज श्रृंगार करून तृतीयपंथीयांनी केली वडाची पूजा PHOTOS
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
महाराष्ट्रासह देशभरात गुरुवारी 21 जून रोजी वटपौर्णिमेचा सण साजरा केला गेला. धुळे शहरात वटपौर्णिमेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांनी वडाच्या झाडाची पूजा केली.
advertisement
1/5

वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.
advertisement
2/5
तृतीयपंथीयांनी धुळे शहरातील आई काळेश्वरीच्या मंदिराजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा केली. यावेळी सर्व तृतीयपंथी बांधवांनी एखाद्या सुहासिनी प्रमाणेच साज श्रुंगार करून नऊवारी साडी नेसली होती.
advertisement
3/5
शहरातील तृतीयपंथी बांधवांनी आपल्या गुरु समवेत एकत्र येऊन वडाची विधिवत पूजा केली. तसेच पूजा करताना सतोजन्मी आपल्याला देवीची व गुरूंची सेवा करण्याचं भाग्य मिळू देत अशी मनोकामना केली.
advertisement
4/5
तृतीयपंथी बांधवांनी आपल्या गुरु समवेत वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून धागा बांधला. दरवर्षी धुळे शहरातील तृतीयपंथी हे हिंदू परंपरेच्या सर्व सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करत असतात.
advertisement
5/5
तृतीयपंथी बांधवांना वडाची पूजा करताना पाहून तेथील काही स्त्रियांनी हळदी कुंकू लागून त्यांना ओवाळले. तसेच त्यांनी सुद्धा वटपौर्णिमेचा सण साजरा केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vat Purnima : 'सातजन्मी तुझीच..', नववारी साडी, साज श्रृंगार करून तृतीयपंथीयांनी केली वडाची पूजा PHOTOS