TRENDING:

खरंच प्रत्येक अवयवाचा होतो व्यायाम...म्हणून सुरू झाली संक्रांतीला पतंगाची परंपरा?

Last Updated:
Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला जशी तीळगूळ वाटण्याची प्रथा आहे, तशीच या दिवशी पतंग उडवण्याचीही परंपरा आहे. संक्रांतीला अनेकजण घराच्या, इमारतीच्या गच्चीवर किंवा अंगणात पतंग उडवताना पाहायला मिळतात. मोठ्या उत्साहाने या दिवशी कोणाचा पतंग उंच आकाशात जातोय, याची स्पर्धा केली जाते. मात्र या सणाला पतंग उडवण्याची परंपरा कशी लाभली बरं, पाहूया.
advertisement
1/6
प्रत्येक अवयवाचा होतो व्यायाम...म्हणून सुरू झाली संक्रांतीला पतंगाची परंपरा?
मकर संक्रांत आणि पतंग हे फार वर्षांपूर्वीचं नातं आहे. खरंतर या दिवसापासूनच वर्षभरातील सणांची सुरुवात होते. त्यामुळे लोक आतुरतेने संक्रांतीची वाट पाहतात. विशेष म्हणजे मकर संक्रांत हा हिंदू धर्मीय सण असला तरी या दिवशी सर्वधर्मीय लोक आनंदाने पतंग उडवतात.
advertisement
2/6
मकर संक्रांतीला संपूर्ण आकाश दिसतं रंगीबेरंगी. चारही दिशांना उडताना दिसतात पतंग. त्यामुळे या दिवसाला पतंगांचा सणही म्हटलं जातं. शिवाय या दिवशी पतंग उडवणं शुभ मानलं जातं.
advertisement
3/6
धार्मिकदृष्ट्या पाहिल्यास मकर संक्रांतीच्या पतंगाचा संबंध भगवान श्रीरामांशी असल्याचं म्हटलं जातं. तर, शास्त्रीयदृष्ट्या पतंगाचा संबंध आरोग्याशी असतो, असं म्हणतात.
advertisement
4/6
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि मारुती एकत्र पतंग उडवायचे. एकदा त्यांचं पतंग उडत उडत इंद्रलोकी गेलं. तेव्हापासूनच पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली, जी आजवर पाळली जाते. त्यामुळे या परंपरेची सुरुवात श्रीरामांनी केली, अशी मान्यता आहे.
advertisement
5/6
तर, शास्त्रीय दृष्टिकोन सांगतो की, पतंग उडवल्यास शरिराची प्रचंड हालचाल होते आणि अनेक व्यायाम एकत्र होतात. मकर संक्रांत हा हिवाळ्यातला सण आहे. म्हणूनच पतंग उडवण्यासाठी बराच वेळ घराबाहेर उन्हात थांबल्याने शरिरात उष्णता निर्माण होते आणि शरीर छान ऊर्जावान राहतं.
advertisement
6/6
यंदा 15 जानेवारीला हा सण साजरा होईल. या दिवशी सूर्य धनू राशीबाहेर पडेल आणि मकर राशीत प्रवेश करेल. म्हणूनच या सणाला मकर संक्रांत म्हटलं झालं. खरंतर हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
खरंच प्रत्येक अवयवाचा होतो व्यायाम...म्हणून सुरू झाली संक्रांतीला पतंगाची परंपरा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल