Traffic Jam in Mumbai: मुंबईकरांनो जपून! लाँग विकेंड संपला अन् रस्ते जाम झाले; ऑफिसला पोहोचायला २ तासांहून अधिक वेळ लागणार
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Traffic Jam in Mumbai: सलगच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आता पुन्हा ऑफिसची लगबग सुरू झाली आहे. शाळा कॉलेज देखील सुरू झाले आहेत. नव्या वर्षात वर्क फ्रॉम होम करणारे देखील आज पहिल्यांदा ऑफिसला जात आहेत.
advertisement
1/6

सलगच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आता पुन्हा ऑफिसची लगबग सुरू झाली आहे. शाळा कॉलेज देखील सुरू झाले आहेत. नव्या वर्षात वर्क फ्रॉम होम करणारे देखील आज पहिल्यांदा ऑफिसला जात आहेत. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना आज करावा लागत आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दी आहेच पण त्याच सोबत रस्त्यांवरही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
2/6
ज्यांना ठाणे ते BKC असा प्रवास करायचा आहे त्यांना थोडा दिलासा आहे. त्यांना एक तास पाच मिनिटं लागू शकता, वाहतूक कोंडी मोठी मिळत नसली तरीसुद्धा संथगतीनंच पुढे सरकावं लागत आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाण्याआधी एकचा ट्रॅफिक अपडेट गुगल मॅपवर नक्की चेक करा.
advertisement
3/6
मिरा रोड ते BKC ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांना दीड तासापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. सलगच्या सुट्ट्या, इयएन्ड आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या सुट्ट्यांमुळे लाँग विकेण्डला आला होता. त्यामुळे लोक फिरायला बाहेर पडले होते. आता पुन्हा कामावर रूजू होण्यासाठी निघालेल्यांना आता ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे.
advertisement
4/6
ज्यांना ठाणे ते मंत्रालय असा प्रवास करायचा आहे त्यांना जवळपास गाडीनं एक तास ३५ मिनिटं ते पावणेदोन तास लागण्याची शक्यता आहे. इस्टर्न एक्सप्रेसवेवर सर्वात मोठा २० मिनिटांचा जाम आहे. त्यात जर तुमची गाडी अडकली तर तुम्ही इथेच फसलात असं समजा.
advertisement
5/6
मिरा रोड ते करी रो़ड जर तुम्ही प्रवास करणार असाल तर जरा सांभाळूनच याचं कारण म्हणजे जवळपास 20 ते 30 मिनिटांचा भलामोठा ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होऊ शकतो. तुम्ही एक ते दीड तास आधीच प्लॅन करून निघा. हे अंतर गाठायला जवळपास २ तास ५ मिनिटं ते २ तास १५ मिनिटं देखील कमीत कमी लागू शकतात.
advertisement
6/6
मिरा रोड ते मंत्रालय, ज्यांना टाउनकडे यायचं आहे त्यांच्यासाठी तर वेळ फार महत्त्वाची आहे. त्यांना हे अंतर गाठण्यासाठी 2 तास १५ मिनिटांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तसं नियोजन करून आणि मॅपवर ट्रॅफिकचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Traffic Jam in Mumbai: मुंबईकरांनो जपून! लाँग विकेंड संपला अन् रस्ते जाम झाले; ऑफिसला पोहोचायला २ तासांहून अधिक वेळ लागणार