TRENDING:

Jammu Attack: पाकिस्तानी सैन्याचा भारतावर तिसरा हल्ला, जम्मूमधील पहिले PHOTOS

Last Updated:
Jammu Attack: भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार हल्ला चढवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता थेट भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
advertisement
1/7
Jammu Attack: पाकिस्तानी सैन्याचा भारतावर तिसरा हल्ला, जम्मूमधील पहिले PHOTOS
भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार हल्ला चढवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता थेट भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानने तिसऱ्यांदा भारतावर हा हल्ला चढवला आहे. जम्मूमधील पहिले PHOTOS समोर आलेत.
advertisement
2/7
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू विमानतळाला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला, ज्यामुळे सीमाभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
advertisement
3/7
पठाणकोट, उधमपूर आणि कुपवाडा यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
advertisement
4/7
पठाणकोट हवाई हद्दीत पाकिस्तानी ड्रोन मोठ्या संख्येने घिरट्या घालत होते. मात्र, सतर्क भारतीय जवानांनी तातडीने या धोक्याची दखल घेत काही मिनिटांतच सर्व ड्रोन निष्क्रिय केले.
advertisement
5/7
पाकिस्तानच्या या आगळीकीनंतर भारतीय लष्कर प्रशासनाने कोणताही धोका पत्करू नये म्हणून संपूर्ण जम्मू शहरात तातडीने ब्लॅकआऊट करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
6/7
जम्मूच्या हवाई क्षेत्रात शत्रूचे ड्रोन दिसताच भारतीय लष्कराने आपली तत्परता दाखवत पाकिस्तानचा नापाक मनसुबा हाणून पाडला. डिफेन्स कॉलनी आणि जम्मू विमानतळाच्या आसपास बॉम्फस्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
7/7
पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, यावेळी सीमेपासून दूर असलेल्या जम्मू विमानतळाला लक्ष्य केले. भारतीय सैन्याच्या शूर जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा डाव उधळून लावला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Jammu Attack: पाकिस्तानी सैन्याचा भारतावर तिसरा हल्ला, जम्मूमधील पहिले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल