Pune News: पुण्यातील धरणात पाण्याचा झाला अचानक हिरवा रंग, धक्कादायक कारण समोर
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune News: पुण्यातील ऐतिहासिक धरणाच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
advertisement
1/7

पुण्यातील भोर तालुक्यात ऐतिहासिक भाटघर धरण आहे. या धरणातील पाण्याचा रंग मागील काही दिवसांपासून हिरवट दिसू लागला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस धरणाच्या पृष्ठभागावर हिरव्या रंगाचा तवंग दिसून येत आहे.
advertisement
2/7
उत्तरेकडील बाजूला असलेल्या संगमनेर, माळवाडी, नऱ्हे आदी गावांच्या काठावरून पाण्यातील रंगबदल सहज लक्षात येतो. भाटघर धरणाचे पाणी हे भोर शहरासह अनेक गावांसाठी मुख्य पाण्याचा स्रोत असून, पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे पाण्याच्या रंगात झालेला हा अचानक बदल नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो.
advertisement
3/7
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, धरणात मत्स्यसंवर्धनासाठी काही व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली असून, हे व्यावसायिक माशांना खाद्य टाकत असल्यानेच पाण्यात अल्गी (शैवाळ) वाढल्याची शक्यता आहे. त्याचमुळे पाण्याला हिरवट तवंग येत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
advertisement
4/7
या संदर्भात पर्यावरण अभ्यासकांनीही पाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरसच्या प्रमाणामुळे शैवाळ वाढण्याची शक्यता मान्य केली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा घटना घडण्याचा धोका अधिक असतो.
advertisement
5/7
काही प्रकारच्या अल्गीमुळे पाणी विषारी बनते आणि मायक्रोसिस्टिनसारखे विषारी घटक निर्माण होतात, जे आरोग्यास अत्यंत हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
6/7
मत्स्यसंवर्धनासाठी दिलेल्या परवानग्यांची चौकशी करण्यात यावी, पाण्याचा रंग बदलण्याचे खरे कारण शोधावे, तसेच आरोग्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
advertisement
7/7
पाणी पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी वापरले जात असल्याने अनेकांना दुर्गंधी येण्याच्या तक्रारीही जाणवत आहेत. त्यामुळे नागरिक अधिकच अस्वस्थ झाले असून, योग्य व वेळेवर उपाययोजना न झाल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune News: पुण्यातील धरणात पाण्याचा झाला अचानक हिरवा रंग, धक्कादायक कारण समोर