Dream life: पूर्वीच्या जुन्या घरात असल्याचं स्वप्न वारंवार का पडतं? असे असू शकतात त्याचे संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream life: आपल्याला स्वप्नात असं घर दिसलं आहे का ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही? तुम्ही अनेकदा भग्न घर पाहून चकित होऊन उठता का? किंवा तुम्ही तुमच्या जुन्या घरात असल्याचं स्वप्नं पाहिलं असेल, जेथे तुम्हाला राहावे वाटते? असे कोणतेही स्वप्न वारंवार किंवा अधूनमधून पाहणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचे संकेतदेखील माहिती असणे आवश्यक आहे. हे स्वप्न तुमच्या मनाची कल्पनाही असू शकते आणि ते भविष्याचे काही संकेतही असू शकतात.
advertisement
1/6

स्वप्नात स्वतःचे जुने घर पाहणे - स्वप्नात जुने घर पाहणे, विशेषत: ज्यामध्ये तुम्ही एकेकाळी राहत होता, हे स्वप्न सूचित करते की तुम्ही तुमच्या भावना दाबण्याचा प्रयत्न करत आहात. त्या घरात राहणार्या कुटुंबातील कोणहीबद्दल तुम्हाला आपुलकी वाटत असते, पण ती व्यक्त करायची नसते.
advertisement
2/6
या स्वप्नाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही काही अडचणीत आहात आणि तुमच्या पूर्वजांना (स्वप्नात पूर्वजांना पाहणे) स्मरण करून मदतीची अपेक्षा करत आहात. तसे, या प्रकारचे स्वप्न तुमच्या भविष्यासाठी फारसे चांगले नाही कारण ते तुम्हाला तणावाच्या स्थितीत आणू शकते.
advertisement
3/6
तुमचे जुने घर खराब झालेले दिसणे - जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुमचे जुने घर दिसले आणि ते खराब स्थितीत आहे असे वाटत असेल तर याचा अर्थ असा होऊ शकतो की, तुम्ही तुमच्या आयुष्यात फारसे आनंदी नाहीत. हे असे होऊ शकते कारण तुम्ही नवीन पाऊल टाकण्याचा विचार करत आहात, परंतु तुम्हाला याची भीतीदेखील वाटत आहे.
advertisement
4/6
कोणत्याही कामाच्या परिणामांची तुम्ही खूप काळजी करता, असाही त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात काय हवे आहे ते ठरवा आणि नंतर पूर्ण प्रामाणिक आणि कठोर परिश्रमाने ते साध्य करण्याचा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा.
advertisement
5/6
स्वप्नात जीर्ण घर पाहणं - जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादे घर दिसले जे तुम्ही आधी पाहिले नसेल आणि तुम्हाला ते अतिशय जीर्ण अवस्थेत दिसले तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला आरोग्याची मोठी समस्या उद्भवणार आहे.
advertisement
6/6
जर तुम्हाला तुमचे सध्याचे घर खराब स्थितीत दिसले तर हे सूचित करते की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे तुम्हाला काही आजार होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा कोणत्याही स्वप्नासह, आपल्याला भविष्याबद्दल आणि आपल्या आरोग्याबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dream life: पूर्वीच्या जुन्या घरात असल्याचं स्वप्न वारंवार का पडतं? असे असू शकतात त्याचे संकेत