TRENDING:

ज्या पैशांची पाहिली वाट, ते आता मिळण्याची शक्यता; यात आहे का तुमची रास?

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. काहीवेळा याच प्रवेशातून शुभ योग जुळून येतात. 30 मे रोजी वृषभ राशीत गुरू आणि शुक्र ग्रह एकत्र आले. म्हणजेच त्यांची युती झाली. अशात गजलक्ष्मी राजयोगासह शश योग आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. यातून काही राशींचं नशीब पार उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलंय. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7
ज्या पैशांची पाहिली वाट, ते आता मिळण्याची शक्यता; यात आहे का तुमची रास?
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू, शुक्र युतीतून गजलक्ष्मी योग निर्माण झाला असून कुंभ राशीत चंद्र आणि शनी आल्यामुळे शश आणि धनिष्ठा नक्षत्राचा योग निर्माण झाला आहे. आता याचा शुभ प्रभाव 5 राशींच्या व्यक्तींवर पडेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया.
advertisement
2/7
मिथुन : आपल्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. आपला आत्मविश्वास कमालीचा वाढेल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. मागील बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता आपल्याला परत मिळतील. परदेशी प्रवासही होऊ शकतो.
advertisement
3/7
सिंह : आपल्यासाठीसुद्धा ही वेळ चांगली आहे. आपला मान-सन्मान वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दाम्पत्य जीवनात सुख येईल. विवाह योग आहे. कुटुंबातील वाद मिटतील. आरोग्यासंबंधित तक्रारी दूर होतील.
advertisement
4/7
तूळ : आपल्या सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. विशेषतः करियरमध्ये यश मिळेल. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्यात प्रगती होईल.
advertisement
5/7
वृश्चिक : आपल्या सर्व गरजा, इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. एकूणच आयुष्य अडचणीमुक्त झाल्यासारखं वाटेल. आरोग्यही उत्तम साथ देईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
मीन : या काळात आपल्या करियरसंदर्भातील सर्व अडचणी दूर होणार आहेत. मागील बऱ्याच काळापासून आपण ज्या पैशांची वाट पाहत होतात, ते पैसे आता आपल्या हातात येतील. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/6-june-just-note-this-date-you-might-get-a-promotion-on-this-day-l18w-mhij-1190394.html">धार्मिक</a> कार्यात सहभागी व्हाल. व्यापार विस्तारेल. आपल्या आईच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
advertisement
7/7
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/vastu-tips-the-ideal-bedroom-for-a-couple-mhij-1190618.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
ज्या पैशांची पाहिली वाट, ते आता मिळण्याची शक्यता; यात आहे का तुमची रास?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल