गुरू देणार मोठी संधी, 3 राशींना मिळू शकतं सर्वकाही; 3 महिने तुमचेच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Guru Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात सर्वच ग्रह, ताऱ्यांना महत्त्व आहे. परंतु गुरू ग्रहाला विशेष महत्त्व आहे कारण त्याला ग्रहांचा राजा म्हणतात. सर्व राशींसाठी गुरुची हालचाल, राशी किंवा नक्षत्रपरिवर्तन महत्त्वाचा मानला जातो. आता लवकरच गुरूचा नक्षत्रप्रवेश होणार आहे. त्यातून काही राशींचं भाग्य प्रचंड उजळेल यात काहीच शंका नाही. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याची कृपा ज्या राशींवर होते, <a href="https://news18marathi.com/religion/">त्या राशींना सुख, समृद्धी, सौभाग्य</a> सारंकाही मिळतं. 13 जूनला गुरूचा रोहिणी नक्षत्रात प्रवेश (Guru Gochar 2024) होईल. 20 ऑगस्टपर्यंत गुरू इथंच मुक्कामी असेल. रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे चंद्र. त्यामुळे हा नक्षत्रप्रवेश आणखी शुभ झाला आहेच, शिवाय गुरू आणि चंद्राची युती 'गजकेसरी योग' म्हणून ओळखली जाते. आता या योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घेऊया.
advertisement
2/5
<a href="https://news18marathi.com/astrology/">मेष :</a> गुरूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे आपलं नशीब कमालीचं बदलेल. प्रचंड आर्थिक लाभ होण्याचा योग आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे बचतही चांगली होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. नवं घर खरेदीचा योग आहे. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या अडचणी आता संपतील. प्रेमविवाहासाठी कुटुंबियांची परवानगी मिळेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
advertisement
3/5
मिथुन : <a href="https://news18marathi.com/tag/rashi-bhavishya-in-marathi/">गुरूचा नक्षत्रप्रवेश आपल्यासाठी</a> अत्यंत शुभ ठरेल. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळेल. नोकरी बदलण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीच्या शोधात असाल तर आता चांगली संधी मिळेल. परदेशी शिकायला जायचं असेल तर आता तो योग जुळून येऊ शकतो. व्यापार विस्तारण्यासाठीही चांगली संधी आहे. आर्थिक फायदा भरपूर होईल. घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं.
advertisement
4/5
कर्क : गुरू ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडणार आहे. नवं काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. वेळ आपल्याला साथ देईल. लहान लहान प्रयत्नांमधून मोठं यश मिळेल. वडिलांच्या सहकार्याने अडकलेली सर्व कामं आता मार्गी लागतील. घरातली भांडणं मिटतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्यही उत्तम साथ देईल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक <a href="https://news18marathi.com/religion/due-to-this-yoga-in-kundali-chances-of-divorce-increase-mpkp-1196555.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
गुरू देणार मोठी संधी, 3 राशींना मिळू शकतं सर्वकाही; 3 महिने तुमचेच!