TRENDING:

तब्बल 30 वर्षांनी जुळून येणार 2 राजयोग! 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकण्याची शक्यता

Last Updated:
ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींवरून आपलं नशीब ठरत असतं आणि ग्रह-तारे वेळोवेळी आपली जागा, स्थिती, दिशा बदलतात. आता तब्बल 30 वर्षांनंतर दोन अत्यंत शुभ योग जुळून येणार आहेत, ज्यांचा कोणाला फायदा होणार सविस्तरपणे जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/5
तब्बल 30 वर्षांनी जुळून येणार 2 राजयोग! 3 राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
उत्तर प्रदेशातील अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, एका ठराविक वेळेनंतर सर्व ग्रह राशीपरिवर्तन करतात. म्हणजेच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. सध्या शनी ग्रह कुंभ राशीत विराजमान आहे. तर 31 मे रोजी बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश झाला. यातूनच शश आणि बुध आदित्य राजयोग निर्माण होत आहेत. ज्याचा परिणाम येत्या काळात सर्व 12 राशींवर होईल, मग त्यातून काही राशींच्या व्यक्तींना सुख अनुभवायला मिळेल, तर काही राशींच्या व्यक्तींच्या पदरात दुःख पडेल. परंतु 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरश: हिऱ्यासारखं उजळून निघणार आहे.
advertisement
2/5
वृश्चिक : या अद्भुत संयोगांमुळे आपला समाजात मान-सन्मान कमालीचा वाढेल. विशेषतः राजकीय क्षेत्राशी संबंध असेल तर प्रचंड यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुख येईल. हाती घ्याल ते प्रत्येक काम सुरळीत पार पडले. थांबलेली सर्व कामं मार्गी लागतील.
advertisement
3/5
वृषभ : आपल्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. व्यवसाय विस्तारेल. करियरमध्ये यश मिळेल. व्यापारात धनलाभ होईल. व्यवसायात चांगली संधी मिळेल. एखादी आनंदाची बातमी मिळण्याचीही शक्यता आहे. आपला परदेशी प्रवास होऊ शकतो. आपण धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
advertisement
4/5
कुंभ : आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्या क्षेत्रात भरभरून यश मिळेल. आपल्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते. एकूणच आपली आर्थिक स्थिती भक्कम होईल आणि समाजात आपला <a href="https://news18marathi.com/religion/the-best-way-to-make-your-married-life-lovable-mhij-1194153.html">मान-सन्मान</a> वाढेल.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/what-is-meaning-of-seeing-shiva-linga-in-dreams-mhij-1194957.html">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/religion/astrology-says-not-to-touch-the-feet-of-these-people-even-by-mistake-mhij-1195257.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तब्बल 30 वर्षांनी जुळून येणार 2 राजयोग! 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल