TRENDING:

तब्बल 50 वर्षांनी आला योग, हे वर्ष अत्यंत भरभराटीचं! 3 राशींना गुड न्यूज मिळणार

Last Updated:
ग्रह-तारे विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल आणि स्थिती बदलतात. त्यातून वेगवेगळे योग तयार होतात. या योगांचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. (रमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
तब्बल 50 वर्षांनी आला योग, हे वर्ष अत्यंत भरभराटीचं! 3 राशींना गुड न्यूज मिळणार
चैत्र महिन्याला ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्याला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीमुळेच वैशिष्ट्य प्राप्त होतं. यंदाचा गुढीपाडवा काही राशींच्या व्यक्तींसाठी खऱ्या अर्थाने भरभराटीचा ठरला. झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा गुढीपाडव्याला तब्बल 50 वर्षांनी या दिवशी राजयोग निर्माण झाला. शश राजयोग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग हे अत्यंत पवित्र मानले जाणारे योग जुळून आले. त्यांच्याच कृपेने 3 राशींच्या व्यक्तींना या वर्षी भरभरून सुख मिळणार आहे. त्यांच्या पदरात एवढं ऐश्वर्य पडेल की त्यांचा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसणार नाही.
advertisement
2/5
मेष : आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे. आता आपली कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नवं काम सुरू करायचं असेल तर त्यातही यश मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर त्यासाठीही उत्तम काळ आहे.
advertisement
3/5
वृषभ : आपल्यासाठी हे वर्ष शुभ ठरेल. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचा योग आहे. उत्पन्न वाढेल, कुटुंबियांसोबत धार्मिक प्रवास होईल. नातेसंबंध सुधारतील. अविवाहितांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येतील.
advertisement
4/5
कर्क : या नवीन वर्षात आपली सर्व अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. गुंतवणूक करायची असेल, तर हे वर्ष अत्यंत शुभ ठरेल. आपल्याला भरपूर आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात सुख, शांतीचं वातावरण असेल. जोडीदारासोबत चांगला प्रवास होईल. आरोग्यही उत्तम साथ देईल. कर्जातून मुक्ती मिळेल.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तब्बल 50 वर्षांनी आला योग, हे वर्ष अत्यंत भरभराटीचं! 3 राशींना गुड न्यूज मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल