'या' 3 राशींच्या वाट्याला आता फक्त सुख येईल! सर्वात शुभ ग्रह आहे तुमच्या पाठीशी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चैत्र नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत भाग्याचे मानले जातात. या 9 दिवसांत दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक वेगवेगळे उपाय करतात. विशेष म्हणजे आता पार पडलेल्या चैत्र नवरात्रीत सूर्य आणि गुरू ग्रहाची युती झाली आहे. या युतीमुळे 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघणार आहे. त्यांच्या वाट्याला आता भरभरून सुख येणार आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिलच्या रात्री <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/most-auspicious-yog-on-ram-navami-2024-l18w-mhij-1164272.html">सूर्याचा मेष राशीत प्रवेश</a> झाला. आता महिनाभर सूर्य याच राशीत विराजमान असेल. गुरू ग्रह आधीच मेषमध्ये होता. त्यामुळे आता सूर्य आणि गुरूची युती झाली आहे. ज्योतिषांनी सांगितलं की, सूर्य आणि गुरूची युती नवम पंचम राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोगासमान मानली जाते. शिवाय गुरू हा सर्वात शुभ ग्रह आहे असं म्हणतात. त्यामुळे सूर्य आणि गुरूच्या युतीचा ज्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडतो त्या राशींच्या व्यक्तींचं भाग्य अक्षरश: हिऱ्यासारखं चाकाकतं.
advertisement
2/5
मेष : सूर्य आणि गुरू <a href="https://news18marathi.com/religion/">ग्रहाची युती</a> याच राशीत झाली आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आपल्या अडचणी आता संपतील. लहान-मोठ्या आजारांपासूनही आपली सुटका होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल. रोजगाराच्या शोधात असाल तर आता यश मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल, त्यामुळे कर्जमुक्ती होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढेल.
advertisement
3/5
कर्क : आपल्याला वडिलोपार्जित मालमत्तेबाबत <a href="https://news18marathi.com/photogallery/astrology/good-day-tension-khallas-after-hanuman-jayanti-fortunes-of-these-6-zodiac-signs-are-invigorated-mhrp-1164784.html">मोठा लाभ होणार आहे.</a> कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. जोपर्यंत सूर्य आणि गुरूची युती असेल तोपर्यंत आपण निरोगी राहाल. करियर आणि व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणुकीसाठी हा कालावधी उत्तम आहे. त्यातून भरपूर नफा मिळेल. इतरांकडे अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील.
advertisement
4/5
तूळ : सूर्य-गुरूच्या या यूतीमुळे आपल्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असेल. ज्यामुळे बचत वाढेल. कुटुंबात शुभकार्य पार पडेल. वडिलांच्या साथीने थांबलेली कामं मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला नफा होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/these-zodiac-signs-will-be-blessed-by-venus-after-navratri-l18w-mhij-1161161.html">समाजात आपला मान-सन्मान वाढेल.</a>
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
'या' 3 राशींच्या वाट्याला आता फक्त सुख येईल! सर्वात शुभ ग्रह आहे तुमच्या पाठीशी