TRENDING:

2000 नंतर पहिल्यांदा घडलं, मे-जूनमध्ये होणार नाही एकही लग्न! असं का?

Last Updated:
या महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 18 एप्रिलनंतर आपल्या घरी सनई-चौघडे वाजवायला काही हरकत नाही. कारण या तारखेनंतर या वर्षात लग्नासाठी तब्बल 12 मुहूर्त आहेत. (रवी पायक, प्रतिनिधी / भीलवाडा)
advertisement
1/5
2000 नंतर पहिल्यांदा घडलं, मे-जूनमध्ये होणार नाही एकही लग्न! असं का?
सध्या बाजारात लग्नखरेदीची लगबग पाहायला मिळते. कारण यंदा तब्बल 23 वर्षांनंतर असं झालंय की मे आणि जून महिन्यात लग्नासाठी एकही शुभ मुहूर्त नाही. साल 2000नंतर असं पहिल्यांदाच घडलंय.
advertisement
2/5
या महिन्यात 18, 19, 21, 22, 23, 25 आणि 26 तारखेला आपण शुभकार्य पार पाडू शकता. त्यानंतर थेट 9, 11, 12, 14 आणि 15 जुलैला शुभ मुहूर्त आहे. गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त होणार असल्याने मे आणि जून महिन्यात एकही शुभ मुहूर्त नाही.
advertisement
3/5
यंदा लग्नासाठी सर्वाधिक शुभ मुहूर्त कधी आहेत पाहूया. एप्रिलमध्ये 18, 19, 20, 21, 22 असे 5 दिवस, जुलैमध्ये 3, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 असे 8 दिवस आणि ऑक्टोबरमध्ये 3, 7, 17, 21, 23, 30 हे 6 दिवस लग्न कार्यासाठी उत्तम आहेत.
advertisement
4/5
दरम्यान लग्न म्हटलं की, सोन्या-चांदीच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असते. परंतु या दोन्ही धातूंचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळतोय.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
2000 नंतर पहिल्यांदा घडलं, मे-जूनमध्ये होणार नाही एकही लग्न! असं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल