IPL 2025 : प्लेऑफमधून बाहेर पडताच कोलकत्ताचा मोठा निर्णय, पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघ आयपीएल 2025च्या हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे कोलकत्ताला सर्वांत मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/8

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघ आयपीएल 2025च्या हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे कोलकत्ताला सर्वांत मोठा धक्का बसला आहे.
advertisement
2/8
केकेआरचा आरसीबी विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द होताच,दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात आला होता. या निकालानंतर कोलकत्ताचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला
advertisement
3/8
केकेआर आयपीएल 2025च्या हंगामातून बाहेर पडल्यानंतर आता पुढील हंगामाची तयारी करण्यापूर्वी ते पाच खेळाडूंना संघातून बाहेर काढून टाकण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये रिंकू सिंग ते वेंकटेश अय्यर अशी नावे आहेत.
advertisement
4/8
केकेआर संघाने आयपीएल 2025 च्या हंगामाच्या लिलावात व्यंकटेश अय्यरचा समावेश 23.75 कोटी रुपयांना केला होता. परंतु या हंगामात अय्यरची बॅट शांत राहिली आणि तो 11 सामन्यांमध्ये फक्त 142 धावा करू शकला. तर त्याने एकही षटक टाकले नाही.
advertisement
5/8
मिडिया रिपोर्टनुसार, वगळण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सलामीवीर क्विंटन डी कॉकचे नाव देखील समाविष्ट आहे. डी कॉक एका सामन्यात फक्त 97 धावा करू शकला आणि त्याशिवाय त्याने काहीही विशेष केले नाही. ज्यामुळे केकेआर आता त्याला सोडू शकते.
advertisement
6/8
केकेआरचा फिनिशर फलंदाज रिंकू सिंग याला फ्रँचायझीने 13 कोटी रुपयांना कायम ठेवले. पण रिंकूची कामगिरी खूपच खराब होती आणि तो 10 सामन्यांमध्ये फक्त 197 धावा करू शकला. रिंकूने काही खास कामगिरी केली नसल्याने संघ त्यालाही सोडू शकतो.
advertisement
7/8
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला केकेआरकडून फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती सामने चुकले तेव्हा तो खेळला आणि सहा सामन्यांमध्ये तो फक्त सहा विकेट घेऊ शकला. त्यामुळे केकेआर अलीलाही सोडू शकतो.
advertisement
8/8
केकेआर संघात आंद्रे रसेलच्या उपस्थितीमुळे, वेस्ट इंडिजचा दुसरा मजबूत फलंदाज रोवमन पॉवेलला संघात फारसे स्थान मिळाले नाही. त्याने या हंगामात आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत आणि फक्त एकाच सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. अशा परिस्थितीत, केकेआर पॉवेललाही वगळू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2025 : प्लेऑफमधून बाहेर पडताच कोलकत्ताचा मोठा निर्णय, पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार?